मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धोनीने 7 वाजून 29 मिनिटांनीच का घेतली निवृत्ती? कारण ऐकून सलाम कराल!

धोनीने 7 वाजून 29 मिनिटांनीच का घेतली निवृत्ती? कारण ऐकून सलाम कराल!

एमएस धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण

एमएस धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण

15 ऑगस्टचा दिवस प्रत्येक भारतीयसाठी खास असतो. यंदा भारत स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत आहे. एका वर्षापूर्वी याच दिवशी देशात अशाच प्रकारचं वातावरण होतं, पण अचानक संध्याकाळी एमएस धोनीने (MS Dhoni) निवृत्तीची घोषणा करून अनेकांना धक्का दिला.

पुढे वाचा ...
  15 ऑगस्ट, मुंबई : 15 ऑगस्टचा दिवस प्रत्येक भारतीयसाठी खास असतो. यंदा भारत स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत आहे. एका वर्षापूर्वी याच दिवशी देशात अशाच प्रकारचं वातावरण होतं, पण अचानक संध्याकाळी एमएस धोनीने (MS Dhoni) निवृत्तीची घोषणा करून अनेकांना धक्का दिला. इन्स्टाग्रामवर धोनीने एक व्हिडिओ शेयर केला, या व्हिडिओमध्ये त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहोत, अशी घोषणा केली. इन्स्टाग्रामवर आपल्या क्रिकेट करियरमधल्या खास क्षणांचा व्हिडिओ धोनीने शेयर केला, या व्हिडिओवर ‘मैं पल दो पल का शायर हूं’ हे गाणं लावण्यात आलं होतं. आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून मला निवृत्त झाल्याचं समजा, असं धोनी या पोस्टमध्ये म्हणाला होता. धोनीने 7 वाजून 29 मिनिटांनीच निवृत्ती का घेतली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. धोनीच्या निवृत्त व्हायच्या या वेळेचं कारणही स्पेशल होतं. भारतामध्ये सगळ्यात शेवटचा सूर्यास्त गुजरातच्या गुहार मोती (Guhar Moti) येथे होतो. 15 ऑगस्ट 2020 ला संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी सूर्यास्त होणार होता, याच कारणामुळे धोनीने त्याच्या निवृत्तीची वेळ स्वातंत्र्य दिनाच्या सूर्यास्ताची ठेवली.
  View this post on Instagram

  A post shared by M S Dhoni (@mahi7781)

  कोरोना संकटामुळे 2020 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्थगित करण्यात आला. या टी-20 वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होणार होता, पण वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे धोनीने संन्यास घ्यायचं ठरवलं, असं निवड समितीने सांगितलं होतं. 2019 वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2019) न्यूझीलंडविरुद्धची (India vs New Zealand) सेमी फायनल धोनीसाठी अखेरची ठरली. या सामन्यात धोनीने 72 बॉलमध्ये 50 रन केले. टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यानंतर धोनीने खालच्या खेळाडूंना घेऊन 240 रनचं आव्हान गाठण्याचा जीवापाड प्रयत्न केला, पण मार्टीन गप्टीलने (Martin Guptill) केलेल्या थ्रोवर धोनी रन आऊट झाला. धोनी क्रीजपासून 2 इंच लांब राहिल्यामुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना धोनीच्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर जवळपास वर्षभर तो क्रिकेटपासून लांब राहिला आणि 15 ऑगस्ट 2020 ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने निवृत्ती घेतल्याच्या एका तासानंतर सुरेश रैनानेही (Suresh Raina) लगेच निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. तसंच आता धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली तर आपणही त्याक्षणी निवृत्ती घेऊ, असंही रैनाने सांगितलं आहे. धोनी आणि रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतात. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार एमएस धोनी 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) , 2011 वनडे वर्ल्ड कप (World Cup 2011) आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2013) जिंकली. याशिवाय धोनीने चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) 2010, 2011 आणि 2018 साली चॅम्पियन बनवलं. आता आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्रातही धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे.
  Published by:Shreyas
  First published:

  पुढील बातम्या