Home /News /news /

या कारणांमुळे झाली मोहन प्रकाशांची उचलबांगडी

या कारणांमुळे झाली मोहन प्रकाशांची उचलबांगडी

महाराष्ट्रात मोहन प्रकाश यांच्याविषयी असलेली नाराजी आणि काही इतर कारणांमुळे त्यांची उलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

सागर कुलकर्णी/सागर वैद्य, नवी दिल्ली, ता.21 जून : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची अखेर गच्छंती झालीय. काँग्रेसचे नवे महाराष्ट्र प्रभारी म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोहन प्रकाश यांच्याविषयी असलेली नाराजी आणि काही इतर कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. तब्बल 10 वर्षांनी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बदलण्यात आलेत. 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा बदल करण्यात आलाय. पक्षाची घसरती कामगिरी आणि वाढती गटबाजी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खरगे, मोहन प्रकाश यांची उचलबांगडी

औरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, 

पालघर पोटनिवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णयही मोहन प्रकाश यांच्या अंगाशी आल्याचं सांगितलं जातंय. तसंच मोहन प्रकाश हे पूर्वाश्रमीचे समाजवादी असल्याने मूळ काँग्रेसी त्यांच्यावर नाराज होते, अशोक चव्हाणांशीही त्यांचं फारसं जमत नव्हतं. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच मोहन प्रकाश यांची गच्छंती झाल्याचं बोललं जातंय. मल्लिकार्जून खरगे हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. कर्नाटकमध्येही काँग्रेसचं पानीपत होण्यापासून वाचवण्यात खरगे यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे खरगे यांचं वजन राहुल गांधी यांच्याजवळ वाढल आहे.

पत्नीने केली आत्महत्या, 8 तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होता पती

लोक व्हिडिओ काढत बसले म्हणून ट्रेनखाली तुटलेला पाय स्वत:च उचलून प्लॅटफॉर्मवर चढला !

काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून खरगे सध्या अत्यंत आक्रमक आहेत. त्यामुळेच 2019 च्या ऑक्टोबरला येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. असं असलं तरी मल्लिकार्जून खरगेंसमोर अनेक आव्हानं आहेत. खरगे यांच्यासमोरची आव्हानं ?
  •  महाराष्ट्र काँग्रेसमधली मरगळ काढणे, गटबाजी कमी करणे
  •  मुंबई आणि प्रदेश काँग्रेसला नव्याने संघटनात्मक बांधणी करणे
  •  आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनिती आखणे
  •  धनगर, दलित, अल्पसंख्यांक मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळवणे.
अशा सगळ्या आव्हानांना खर्गे यशस्वीपणे सामोरं जातील, असा काँग्रेसच्या हायकमांडला विश्वास वाटत असावा, कदातिच म्हणूनच महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याची धुरा त्यांच्याकडे सोपवलीय    
First published:

Tags: Ashok chavan मोहन प्रकाश, Maharashtra congress state incharge, Mallikarjun kharge, Mohan prakash, Rahul gandhi, Remove, अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र काँग्रेस, राहुल गांधी

पुढील बातम्या