लता दीदी@90 : ...आणि लता दीदींनी रफी साहेबांसोबत गायला दिला नकार

लता दीदी@90 : ...आणि लता दीदींनी रफी साहेबांसोबत गायला दिला नकार

लता मंगेशकरांचा आवाज आणि स्वभाव हा जरी मृदू, मुलायम आणि शांत असला तरी त्यांचा स्वभाव मात्र अत्यंत बाणेदार आहे. या बाणेदारपणाचा अनुभव प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनाही आला होता.

  • Share this:

मुंबई, ता.26 सप्टेंबर : गानकोकीळा लता मंगेशकरांचा आवाज आणि स्वभाव हा जरी मृदू, मुलायम आणि शांत असला तरी त्यांचा स्वभाव मात्र अत्यंत बाणेदार आहे. या बाणेदारपणाचा अनुभव प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनाही आला होता. गायकांच्या हितासाठी भांडणाऱ्या लता दीदींनी याच कारणांवरून रफी साहेबांसोबत गायला चक्क नकारही दिला होता. याचं नेमकं कारण काय होतं याचा किस्सा लता दीदींनीच 'न्यूज18 लोकमत'ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितला होता.

चित्रपटसृष्टीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी या दोन विख्यात गायकांनी अनेक अजरामर गाणी दिली. त्या गाण्यांच्या अवीट स्वरांनी अनेक पीढ्यांचं आयुष्य समृद्ध झालं. आजही त्यांची गाणी तेवढीच गोड आणि ऐकाविशी वाटतात. पण एकेकाळी या दोघांमध्ये भांडणही झालं होतं हे आता सांगूनही कुणाला खरं वाटत नाही. दीदींनी सांगितेला किस्सा असा आहे...

दीदी म्हणाल्या, त्या काळात पार्श्वगायकांना फार काही किंमत दिली जात नव्हती. गाण्यांची रॉयल्टीही मिळत नसे. मला हे पटलं नाही. गायकांनाही रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी मी मागणी केली. त्यासाठी इतर गायकांनाही तयार केलं. याच कारणांमुळे आम्ही एचएमव्ही कंपनीसोबत गाणी करणं थांबवलं होतं.

पण असं असतानाही रफी साहेबांनी त्यांच्यासोबत गाणं केलं. मी त्यांना याबाबत विचारलं की तुम्ही असं का केलं? ते म्हणाले ते म्हणाले पार्श्वगायकाचं एवढं काय असतं? त्यांनी पैसे दिले, मी गाणं केलं. मी म्हटलं तसं नाही. ते रकॉर्ड करून विकतात, पैसे कमावतात. त्याचा मोबदला गायकांना मिळाला पाहिजे.

आपल्या देशामध्ये गाण्यांवर चित्रपट चालतात, इतर देशांमध्ये नाही. त्यावरून रफी साहेब आणि माझं भांडण झालं. रफी साहेब मला रागानं महाराणी म्हणाले...मी चिडले आणि म्हटलं होय, मी महाराणी आहे! तुम्ही असं बोलू शकत नाही.

त्यानंतर ते म्हणाले मी तुझ्यासोबत गाणार नाही.

मी म्हटलं मीच तुमच्यासोबत गाणार नाही. मी बाहेर गेले आणि सर्व दिग्दर्शकांना फोन करून सांगितलं की मी रफी साहेबांसोबत गाणार नाही, तुम्ही गाणं दुसऱ्यांकडून करून घ्या. नंतर मग गायकांना गाण्याची रॉयल्टी मिळायला लागली.

VIDEO: चिमुकला होता समोर तरीही महिलेने घातली अंगावरून गाडी, पण...!

First published: September 27, 2018, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading