मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'घरवापसी'वर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, म्हणाले, 'देवेंद्रजींना भेटणार पण...'

'घरवापसी'वर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, म्हणाले, 'देवेंद्रजींना भेटणार पण...'

नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात

नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात

एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  sachin Salve

मुक्ताईनगर, 24 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण, अमित शहांना याआधीही भेटलो, आता देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.

सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांचं व्यस्त शेड्युल असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. मात्र एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. या खुलाशानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण, खडसेंनी यावर खुलासा केला आहे.

('दसरा मेळाव्याला गुलाल उधळत या, पण...', उद्धव ठाकरेंची सर्वात पहिली प्रतिक्रिया)

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. अमित शहा यांना भेटू नये, असा काही नियम आहे का, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे माझे जुने संबंध आहे. गोधडीमध्ये होते, तेव्हा पासून परिचय आहे. मी अमित शहा यांनी एकवेळा भेटलो असं नाही, याआधीही भेटलो आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी भेटणार आहे म्हणून याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं खडसे म्हणाले.

एका घरामध्ये दोन पदं आहे, हे काही आमच्याच घरात नाही. गिरीश महाजन यांच्या घरामध्ये 30 वर्षांपासून साधनाताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. आता नगराध्यक्ष आहे. गुलाबराव पाटील यांचा मुलगा हा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. एका घरामध्ये अनेक जण असतातच. राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असते, ते निवडून येतात, ज्यांच्यामध्ये क्षमता नसते जनता त्याला पराभूत करते, असंही खडसे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतल्याचा दावा केला होता. आता एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आम्ही अमित शहा यांना भेटायला गेलो होतो मात्र भेट झाली नसून त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

(एकनाथ खडसे आणि अमित शहांची फोन पे चर्चा, घरवापसीच्या चर्चांना उधाण)

विशेष म्हणजे, भोसरी भूखंड प्रखरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा खडसेंच्या भूखंड प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्या भेटीमुळे खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे.

First published: