...म्हणून भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहे मुस्लिमांची साथ; काय आहे रणनीती?

...म्हणून भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहे मुस्लिमांची साथ; काय आहे रणनीती?

Why is it necessary for BJP to co operate with muslims ः भाजपला का हवी मुस्लीमांची साथ?

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर भाजप मुस्लिमांप्रति आणली रणनीती बदलली आहे. सध्या देशात, राज्यात मॉब लिंचिंगवरून भाजपला लक्ष्य केलं जात असलं तरी केंद्र सरकारचे काही निर्णय हे मुस्लिमांच्या पक्षात जाताना दिसत आहेत. त्याचा फायदा हा भाजपला होताना दिसत आहे. ईदचं निमित्त करत केंद्र सरकारनं 5 कोटी मुस्लीम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली त्यानंतर भाजप समर्थक असलेल्या साधु – संतांनी त्याला विरोध केला. पण, भाजप मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. मागील काही घडामोडी आणि निर्णय पाहता आता भाजपला मुस्लीम समाज का महत्त्वाचा आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगल्या आहेत.

दुधाची पिशवी परत द्या; मिळवा इतके पैसे

भाजपला का हवा मुस्लिमांचा पाठिंबा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वमान्य नेता अशी प्रतिमा तयार होण्यासाठी मुस्लिमांची साथ गरजेची असल्याचं भाजप नेतृत्व जाणतं. तसंच, पक्ष विस्तारासाठी देखील भाजपला मुस्लिमांची साथ गरजेची आहे. शिवाय पक्ष विस्ताराचा, राजकारणाचा विचार करता केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगनामध्ये मुस्लिमांच्या मदतीशिवाय ते भाजपला शक्य नाही.

‘कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं’; डॉक्टरांचा सल्ला

काँग्रेसपासून लांब जाईल मुस्लीम?

ईदनिमित्त 5 कोटी विद्यार्थ्यांना दिलेली शिष्यवृत्ती, तिहेरी तलाक विधेयक यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरळसरळ काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर, शहाबानो प्रकरणाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरिफ मोहम्मक खांचा उल्लेख केला. ही काँग्रेसची दुखती नस असल्याचं बोललं जात आहे.

नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारचा दणका; चार बँक खाती सील

मुस्लीम भाजपसोबत आहेत?

सध्याचं राजकारण पाहता भाजप अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवून होणाऱ्या राजकारणाला संपवू इच्छिते. तिहेरी तलाक विधेययकाच्या माध्यमातून भाजप मुस्लीम महिलांचा समान हक्क आणि न्याय यावर बोलू इच्छिते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा राजकारणाचा दूरवर विचार करते. म्हणून राम मंदिराच्या मुद्द्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेचा दबाव असताना देखील या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर भर दिला. त्याचा परिणाम हा लोकसभा 2019च्या निवडणुकीमध्ये दिसून आला आणि एनडीएची सत्ता केंद्रात आली.

टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या