नवी दिल्ली, 05 मे : गेल्या काही महिन्यांत, कोरोना माहामारीने (Corona Pnademic) जगभरात हाहाकार माजवला आहे. जागतिक पातळीवर, संक्रमित लोकांची संख्या 36 लाखांच्या पुढे गेली आहे. या सगळ्यात, जगातील शास्त्रज्ञ देखील या साथीसंदर्भातील गुपितं शोधण्याचा आणि यावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बर्याच संशोधनात असा दावाही करण्यात आला आहे की, या साथीमुळे मोठ्या संख्येने प्राणीही धोक्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग माकड, कुत्री, पाळीव मांजरी आणि अगदी वाघापर्यंत पसरला आहे. त्यामुळे हा खूप भयानक रोग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जनावरांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची धोका पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मानव या माहामारीमुळे आहेत धोक्यात
बरेच प्राणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही संशोधकांचा असा विश्वास आहे की, या साथीचा मुख्य धोका मानवाला आहे. त्याचबरोबर या साथीचा प्रसार होण्याचा धोका मानवांमध्येच आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात विषाणूचं संशोधन करणार्या जेन सायकेस यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचं प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये हस्तांतरण झाल्याचं सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही.
प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होत नाही
कदाचित हेच कारण आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग माणसांकडून प्राण्यांमध्ये पसरल्याची प्रकरणं समोर आली आहेत, परंतु प्राण्यांपासून ती इतर जनावरांमध्ये पसरल्याची कोणतीही घटना समोर आली नाही. प्राण्यांच्या काही प्रजातींमध्ये हा विषाणू पसरल्याचे काही पुरावे संशोधनात देखील सापडले आहेत, परंतु या रोगाचा प्राण्यांवर फारसा परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही.
काम बंद असल्याने पैसे नाहीत, नवऱ्याच्या औषधांसाठी पत्नीने ठेवलं मंगळसूत्र गहाण!
पृष्ठवंशी प्राण्यांवर होऊ शकतो सर्वाधिक परिणाम
कोरोनाव्हायरस इतर विषाणूंपेक्षा खूप वेगाने पसरतो. परंतु संशोधकांचा असा विश्वास आहे की, व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम पृष्ठवंशी प्राण्यांवर होऊ शकतो. पृष्ठवंशी सजीव म्हणजे ज्यांना पाठीचा कणा (backbones)किंवा पृष्ठवंश (spinal comumns)असतो. आणि यामुळेच या कोरोना विषाणूंचा मानवांमध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. पृष्ठवंशी प्राण्यांपैकी, मानवी पाठीचा कणा सर्वात विकसित मानला जातो.
ACE2 प्रथिने ठरतात कोरोनासाठी योग्य
खरंतर, कोरोना विषाणू ACE2 प्रोटीनमधून मानवी शरीरात प्रवेश करतो. हे ACE2 प्रथिनं जवळजवळ सर्व पृष्ठवंशींमध्ये आढळतात. कोणत्याही विषाणूच्या जीवात शरीरात प्रवेश करण्यासाठी त्याचे समान रेणू असणे आवश्यक आहे. ACE2 प्रथिने कोरोनासाठी योग्य असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे.
हेच कारण आहे की, आतापर्यंत माणसांच्या सर्वात जवळ असलेल्या मांजरी आणि कुत्र्यांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणं आढळली नाही. हे दोन्ही पृष्ठवंशीं जीव आहेत. पण, संशोधकांचं असं म्हणणं आहे की, हे विषाणू मानवाकडून या प्राण्यांमध्ये पसरला असला तरी तरी तो अद्याप प्राणी स्वत: रोगाचा प्रसार करत नाहीत.
दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मॉर्निंग वॉकला मुभा द्यावी, पुण्यातून नवी मागणी
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.