मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला?' संतप्त तरुणाचा आरोग्य सेविकेवर हल्ला

'आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला?' संतप्त तरुणाचा आरोग्य सेविकेवर हल्ला

पोलीस कर्मचारी हे समोर उभे असुनही त्यांनी आरोपीला कोणताही मज्जाव न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही आरोग्यसेविकांनी केला आहे.

पोलीस कर्मचारी हे समोर उभे असुनही त्यांनी आरोपीला कोणताही मज्जाव न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही आरोग्यसेविकांनी केला आहे.

पोलीस कर्मचारी हे समोर उभे असुनही त्यांनी आरोपीला कोणताही मज्जाव न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही आरोग्यसेविकांनी केला आहे.

सोलापूर, 25 मार्च : सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दिल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकाकडून आरोग्य सेविकेवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेविकेला बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही आरोग्य सेविकेने केला आहे. गोरख विटकर असे या आरोपीचे नाव आहे. विडी घरकूल परिसरातील आरोग्य केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Why did the mother report positive Angry youth attacks health worker)

धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणारा आरोपी गोरख विटकर याने महिला आरोग्य सेविकेला शिवीगाळ करत अंगावर बाकडा फेकून हाणल्याचा व्हिडिओदेखील आरोग्य सेविकांनी दिला आहे.

आरोपी गोरख विटकर याने, माझ्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला, असे विचारत हा हल्ला आणि धमकी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य सेविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस कर्मचारी हे समोर उभे असुनही त्यांनी आरोपीला कोणताही मज्जाव न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही आरोग्यसेविकांनी केला आहे.

त्यात आणखी कहर म्हणजे, एम.आय. डी.सी. पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील आरोग्य सेविकांची तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही आरोग्य सेविकांनी केला.

दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे आरोग्य सेविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांच्या अकार्यक्षमेतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे ही वाचा-Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का?

सोलापूर शहरात व्यावसायिक आणि दुकानदारांची कोरोना तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास करण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तपासणीचे काम केले जात आहे. मात्र अशा घटनांमुळे सोलापुरातील आरोग्य सेविका चिंताग्रस्त असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. मात्र दुसरीकडे अशा घटनांमुळे रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण अशा हल्ला करण्याच्या घटनांमुळे आरोग्य सेविकांमध्ये भीती बसून ट्रेसिंगमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षेचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Solapur