शिवाजी महाराजांचं नाव हटवल्यानं वाद चिघळणार, मराठा ठोक मोर्चाची ठाकरे सरकारला थेट धमकी

शिवाजी महाराजांचं नाव हटवल्यानं वाद चिघळणार, मराठा ठोक मोर्चाची ठाकरे सरकारला थेट धमकी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे नव्हते का? सरकारी योजनेला कुणाचं नाव द्यायचं हा सर्वस्वी सरकारचा अधिकार असला तरी नाव का बदल?

  • Share this:

ठाणे, 23 डिसेंबर :  कर्जमाफी योजनेवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का हटवले याचा महाविकास आघाडीने येत्या 8 दिवसात खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्रभर कृषी मंत्री यांना फिरकू दिलं जाणार नाही. त्याचा जाब सर्व पक्षाला द्यावा लागणार असा इशारा मराठा क्रांती ठोका मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे नव्हते का? सरकारी योजनेला कुणाचं नाव द्यायचं हा सर्वस्वी सरकारचा अधिकार असला तरी नाव का बदललं ? हे विचारणं जनतेचा अधिकार आहे. अशा कशोर शब्दात मराठा क्रांती ठोका मोर्चाने भूमिका घेतली आहे.

'महाआघाडी सरकारचा मराठा समाजावर राग दिसतोय'

'शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काढून टाकण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हटवण्याच्या घोषणेबाबत कसलंही कारण द्यावं असं राज्यातल्या महाआघाडी सरकारला वाटलं नाही. हा रयतेच्या राजाचा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. ज्या राजाच्या शासन पद्धतीला जगात मान आहे. ज्या शिवरायांच्या राजमुद्रेला प्रमाण मानून महाराष्ट्र शासनाची वाटचाल सुरू आहे. त्या महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून टाकावे ही अत्यंत अपमानास्पद बाब असून ती एकाही शिवप्रेमीला आवडलेली नाही. सत्तेत आल्यापासून महाआघाडी सरकारचा मराठा समाजावर राग दिसतोय' अशी टीका आबासाहेब पाटील यांनी केली आहे.

#BREAKING: हायवेवर ट्रक आणि खासगी वाहनाचा भीषण अपघात, 8 प्रवाशांचा मृत्यू

'सर्वप्रथम या सरकारने सारथी संस्थेचा खेळखंडोबा केला. त्यानंतर, मराठा आरक्षण मिळवून देणारे वकील एकारात्रीत गुपचूप हटवले आणि आता तर कुळवडी भूषण छत्रपती शिवरायांचे नाव कर्जमाफीच्या योजनेतून काढून टाकलं. माझा राज्य सरकारला सवाल आहेत. कर्जमाफी योजनेच्या नावातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का हटवले? ठाकरे सरकार मधल्या कुठल्या मंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून टाकायची शिफारस केली? छत्रपती शिवाजी महाराज यांना ठाकरे सरकार कुळवडी भूषण मानत नाही का?' असे सवाल आबासाहेब पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

ठाकरे सरकारला छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे वाटत नाहीत का? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही केलं की नाही? आघाडी सरकारचा मराठा समाजावर राग कशासाठी आहे? आणि कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किती दिवसात देणार? महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारने याचा लवकरात लवकर खुलासा करावा अन्यथा कृषिमंत्र्यांना महाराष्ट्रभर जाब विचारला जाईल आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असेल असा इशारा मराठा क्रांती ठोका मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर? भरचौकात टक्कल करून मारहाण

First Published: Dec 23, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading