गुजरातमधून का होतंय उत्तर भारतीयांचं पलायन?

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्याने तणावाची परिस्थिती आहे. आत्तापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोक गुजरात मधून बाहेर गेल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2018 03:51 PM IST

गुजरातमधून का होतंय उत्तर भारतीयांचं पलायन?

गांधीनगर, ता.10 ऑक्टोबर : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्याने तणावाची परिस्थिती आहे. आत्तापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोक गुजरात मधून बाहेर गेल्याची माहिती आहे. या हल्ल्यांबद्दल देशभर चिंता व्यक्त करण्यात येतेय. तर परिस्थिती नियंत्रणात असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं गुजरात सरकारनं म्हटलं आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा झाल्याने हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरात मध्ये उत्तर भारतीयांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या.

नेमकी घटना काय घडली?

गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यात एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेतला आरोपी हा बिहारमधला एक मजूर असल्याचं स्पष्ट झालं. या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. या घटनेनंतर सोशल मीडियावरून प्रक्षोभक मेसेज पसरविले गेले. त्यानंतर हल्ल्यांना सुरूवात झाली. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधल्या नागरिकांना टार्गेट करण्यात आलं.

त्यामुळं या राज्यांमधल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गुजरातमध्ये हॉटेल्स आणि कारखाण्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय तरूण गुजरातमध्ये आले आहेत. कमी पैशांमध्ये कठिण मेहेनत करण्याची तयारी या लोकांची तयारी असते त्यामुळं या लोकांना लवकर काम मिळतं.

पोलिसांची काय आहे भूमिका?

Loading...

गुजरातमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर देशभर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं. ते म्हणाले आत्तापर्यंत 342 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

ज्या भागात हल्ल्यांच्या घटना घडल्या त्या भागात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलीय. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असून प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह माहिती पसरविणाऱ्या काही समाज कंटकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

संजय निरूपम यांची टीका

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरच्या हल्ले होत असल्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय. उत्तर भारतीयांवरचे हल्ले कमी झाले नाहीत तर नरेंद्र मोदींना वाराणशीत यावं लागतं हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा संजय निरूपम यांनी दिला आहे. हे हल्ले तातडीनं थांबले पाहिजेत आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

 

नितिश कुमारांची चिंता

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी या प्रश्नावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उत्तर भारतीयांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. गुजरात सरकारही कारवाई करत असून हल्लेखोरांवर सरकार कारवाई करत असल्याही माहिती रूपाणी यांनी दिल्याचं नितिश कुमार यांनी स्पष्ट केलं.

उत्तर भारतीयांमध्ये भीती

बलात्काराच्या घटनेनंतरच्या हल्ल्यांनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने बिहार आणि उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग निवडलाय. परिस्थिती शांत होईपर्यंत आपण गावी जात असल्याचं अनेकांनी सांगितलं. तर लोक सण-उत्सवांसाठी गावी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. रेल्वे स्थानकांवरही प्रचंड गर्दी असून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी आहे.

ठाकोर सेना

उत्तर भारतीयांवरच्या हल्ल्यांना ठाकोर सेना जबाबदार असल्याचा आरोप होतोय. मात्र काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकुर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. ठाकूर किंवा क्षत्रिय समाजाची कुठलीही संघटना या हल्ल्यांमध्ये सामील नसून पोलीस विनाकारण फसवत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. आमचं भांडण सरकार आणि कारखाण्यांशी आहे. स्थानिकांना रोजगार देण्याचं आश्वासन कारखाण्यांनी पाळलं नाही असा आरोपही त्यांनी केला.

VIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...