मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

vinayak mete : तो ट्रक कुणाचा? विनायक मेटे यांच्या पत्नीने 3 ऑगस्टच्या घटनेबद्दल व्यक्त केला संशय

vinayak mete : तो ट्रक कुणाचा? विनायक मेटे यांच्या पत्नीने 3 ऑगस्टच्या घटनेबद्दल व्यक्त केला संशय


'ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता.

'ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता.

'ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता.

  • Published by:  sachin Salve
बीड, 16 ऑगस्ट :  शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे  (vinayak mete death case) यांचं अपघाती निधन झालं आहे. आज या प्रकरणी त्यांच्या सहकाऱ्याने खळबळजनक खुलासा केला आहे. 3 ऑगस्ट रोजी एका कार आणि ट्रकने मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता. आता विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनीही संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. पण 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खुलासा मेटेंचे  सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. या प्रकरणावर न्यूज18 लोकमतशी बोलताना मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'काही गोष्टी अनाकलनिय आहे, त्या गोष्टींचे सत्य समोर आले पाहिजे. 3 तारखेला गाडीने पाठलाग केला होता. पोलिसांनी आता एक गाडी गुजरातमधून ताब्यात घेतली आहे. आता ती गाडी आणि अपघात झाल्यानंतर सापडलेली गाडी समान आहे का पाहावी लागेल' असं ज्योती मेटे म्हणाल्या. 'ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता.  मला या गोष्टींचा उल्लेख झाला पाहिजे. गाडीचा ड्रायव्हर आहे तो सगळं सांगू शकतो किंवा पोलीस तपासातून समोर आलं पाहिजे.  आमच्या कुटुंबीयांची हीच मागणी आहे, या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक  समिती नेमली आहे, पोलीस तपासातून खरं काय सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 3 ऑगस्टला शिक्रापूरजवळ काय घडलं होतं? शिक्रापूरजवळ एक गाव होतं. तिथे अडीच किलोमिटरपर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता. ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती. आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे साहेबांनी गाडीचा नंबर घेऊन ठेव, असं सांगितलं. बीडमधून मुंबईला निघालो होतो,  रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली. जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं. या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना सांगितलं होतं.  या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या