नवी दिल्ली, 03 मे : लोकसभेचा निकाल खरंतर 23 मे रोजी लागणार आहेत. पण त्याआधीच विरोधकांमध्ये पंतप्रधानपदावरून जोर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. येत्या 21 मे रोजी दिल्लीत पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित बैठक होणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच ही माहिती दिली आहे.