मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी, मुख्यमंत्री कुणाला देणार पसंती ?

मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी, मुख्यमंत्री कुणाला देणार पसंती ?

मुंबई पोलीस आयुक्त...या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही आहे.

  • Share this:

अजित मांढरे,मुंबई

29 जून : राज्याच्या पोलीस दलात सध्या एकच प्रश्न चर्चिला जातोय आणि तो म्हणजे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार ? कारण राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी दत्ता पडसलगीकरांची वर्णी लागू शकते.

मुंबई पोलीस आयुक्त...या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही आहे. या पदाला आजवर अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाने जगभर मान मिळवून दिलाय. त्यामुळे एकदा तरी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा मुकुट घालता यावा, अशी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा असते.

दत्ता पडसलगीकर हे पोलीस महासंचालकपदी विराजमान झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त कोण? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे. तर अनेक पोलीस अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदी कोण?

सुबोध कुमार जैस्वाल?

सुबोध कुमार हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी

लो प्रोफाईल अधिकारी, भाजप नेत्यांशी जवळीक या जमेच्या बाजू

संजय बर्वे ?

१९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी

सध्या राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख

चमकदार कामगिरी नाही पण प्रशासनावर उत्तम पकड

पण आदर्श घोटाळ्यात नावं आल्याने काहिसा अडसर

परमबीर सिंग?

१९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशा ख्याती

पण विरोधी पक्षांशी जवळीक अडचणीची

रश्मी शुक्ला?

सध्या पुणे पोलीस आयुक्तपदी

मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला म्हणून संधी मिळू शकते

पण, महाराष्ट्र बॅंक प्रकरणामुळे सरकारची खप्पा मर्जी होऊ शकते

यांच्या व्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार १९८६ बॅचचे एस पी यादव, संजय पांडे, १९८७ बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी कनकरत्नम, हेमंत नगराळे, १९८८ बॅचचे रजनीश शेठ, के व्यंकटेशम यांना ही मुंबई पोलीस आयुक्त पदाची अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या आठवड्या भरात कोण होणार मुंबई पोलीस आयुक्त याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 11:42 PM IST

ताज्या बातम्या