• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राधेश्याम मोपलवारांची कुंडली काय सांगतेय?

राधेश्याम मोपलवारांची कुंडली काय सांगतेय?

समृद्धी हायवे जमीन खरेदीतील दलाली संदर्भात एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरून हटवण्यात आलंय. दलालासोबत लाच स्वीकारण्यासंबंधीची बोलणी करतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

  • Share this:
मुंबई, 3 ऑगस्ट : समृद्धी हायवे जमीन खरेदीतील दलाली संदर्भात एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरून हटवण्यात आलंय. दलालासोबत लाच स्वीकारण्यासंबंधीची बोलणी करतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. विरोधकांनी गेल्या दोन दिवसांपासून हा मुद्दा सभागृहात लावून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. आणि एमएसआरडीसीच्या एमडी पदावरून त्यांची गच्छंतीही करण्यात आलीय. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा आपला नसल्याचा दावा मोपलवार यांनी केलाय. तरीही सरकारने या संपू्र्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरून हटवलंय. पाहुयात हे राधेश्याम मोपलवार नेमके आहेत तरी कोण ? मोपलवारांची कुंडली काय सांगतेय? - नांदेड इथं जिल्हाधिकारी म्हणून 4 वर्षं काम - महाराष्ट्र जीवन प्रधिकरणात काही काळ पदभार सांभाळला - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्याधिकारीपदावर काम - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळात सदस्य सचिव - कोकण विभागीय आयुक्त म्हणूनही काम पाहिले - सध्या एमएसआरडीचे एमडी आणि व्हाईस चेअरमन - मार्च 2018ला होणार निवृत्त पण त्याआधीच पदावरून गच्छंती
First published: