मुंबई, 10 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती 13' (Kaun Banega Crorepati) (KBC 13) चा सध्याच्या शोमधील एक सवाल सध्या मोठ्या चर्चेत आहे. आज हॉटसीटवर दीपिका पदुकोन आणि फरा खान आल्या होत्या. यावेळी बिग बींनी त्यांना पहिलाच प्रश्न असा काही विचारला की अनेकजणं तो पाहून हैराण झाले. कौन बनेगा करोडपती यामध्ये विचारले जाणारे प्रश्न मेंदूला चालना देणारे असतात व ते तशेच असावे अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते.
मात्र अशा या प्रश्नानंतर मात्र प्रेक्षकांची निराशा झाली आहे.
मुंबईच्या भाषेत सर्वसाधारणपणे कोणत्या व्यक्तींना 'फट्टू' म्हटलं जातं, असा सवाल कौन बनेगा करोडपडीमध्ये अमिताभ बच्चन यांनी दीपिका पदुकोन आणि फरा खान या दोघींना विचारला. श्रीमंत, घाबरट, आळशी असे पर्याय दिले होते. याचं योग्य उत्तर अर्थान घाबरट असं होतं. मात्र अशा पद्धतीचा प्रश्न कौन बनेगा करोडपतीमध्ये विचारला गेल्याने प्रेक्षकांनी भुवया उंचावल्या आहे.
हे ही वाचा-KBC 13 : स्वप्नांना मिळालं आर्थिक पाठबळ; रकमेतून ते स्वप्न पूर्ण करणार किन्नरी
या प्रश्नानंतर फरा खान म्हणाली की, आपल्या क्षेत्रात अनेक जणं फट्टू आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांची नावं विचारली असता नंतर सांगेन असंही फरा खान त्यांना म्हणाली.
स्वप्नालाही पंख फुटणार...
‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) अर्थात केबीसीचं (KBC) 13 वं पर्व सुरू झालं आणि अनेकांच्या स्वप्नांना (Dreams) धुमारे फुटले आहेत. या शोमधून अनेकांना काही प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळते. एक कोटी जिंकणाऱ्या भाग्यवान विजेत्याला सात कोटी जिंकण्याचीही सुवर्णसंधी असते. त्यामुळे देशभरातील लाखो लोक या शोमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडत असतात. कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आई-वडिलांसाठी तर कोणाला समाजासाठी काम करण्याकरता या शोमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवायचे असतात. वर्षानुवर्षे एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तींची स्वप्नं यामुळं पूर्ण होतात तेव्हा स्पर्धकासह प्रेक्षकही हर्षोल्हासित होतात. बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांना भेटणं हे देखील अनेकांचं स्वप्न असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Deepika padukone, KBC