News18 Lokmat

एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेला कोण आहे युसूफ अझर?

एअर स्ट्राईकमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझरच्या दोन भावांसह युसूफ अझर देखील ठार झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 04:47 PM IST

एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेला कोण आहे युसूफ अझर?

दिल्ली, 26 फेब्रुवारी : बालाकोटमध्ये भारतीय वायू दलानं केलेल्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम ठार झाला. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांचे लॉचिंग पॅड उद्धवस्त केले. यातील जैशच्या तळाची जबाबदारी ही युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमकडे होती. हल्ल्यावेळी युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम हा तळावर होता अशी माहिती आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझरच्या दोन भावांसह युसूफ अझर देखील या हल्ल्यामध्ये ठार झाला आहे.

कोण आहे युसूफ अझर

अझर मसूदचा मेव्हणा असलेला युसूफ अझरच्या खांद्यावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबादारी होती. 1999मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा युसूफ अझर मास्टर माईंड होता. त्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची होती. यावेळी भारतानं अझर मसूदसह दोन दहशतवाद्यांची सुटका केली होती.

2000मध्ये भारतानं पाकिस्तानला दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. त्यामध्ये युसूफ अझरचा देखील समावेश होता. युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

असा झाला Air Strike

Loading...

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींना रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्लाचा प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...