मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /WHO च्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात 10 कोटीहून अधिक लोकांना हिपॅटायटीस ए ची लागण होते

WHO च्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात 10 कोटीहून अधिक लोकांना हिपॅटायटीस ए ची लागण होते

हिपॅटायटीस ए आजार, प्रतिबंध आणि लसीकरणाविषयी सविस्तर माहिती.

हिपॅटायटीस ए आजार, प्रतिबंध आणि लसीकरणाविषयी सविस्तर माहिती.

हिपॅटायटीस ए आजार, प्रतिबंध आणि लसीकरणाविषयी सविस्तर माहिती.

    पॅटायटीस कशामुळे होतो हे जाणून घेवूया.

    हिपॅटायटीस ए हे एक लिव्हरचे संसर्गजन्य संक्रमण आहे, जे हिपॅटायटीस ए विषाणूमुळे होते. त्याची तीव्रता सौम्य आजारापासून गंभीर आजारापर्यंत असू शकते, जी काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत टिकू शकते.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार दरवर्षी 10 कोटी लोकांना हिपॅटायटीस ए ची लागण होते1. हा लिव्हर संसर्ग सामान्यत: मुलांमध्ये सौम्य आणि सामान्य मानला जातो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो गंभीर होऊ शकतो3. मोठ्या मुलांमध्ये आणि प्रौढांमधे, सामान्यतः संसर्गामुळे जास्त गंभीर लक्षणे उद्भवतात, कावीळ हा त्यापैकीच एक आहे. 70% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये तो उद्भवतो.

    " isDesktop="true" id="587701" >

    हिपॅटायटीस ए संसर्गामुळे तीव्र संक्रमण होत नाही, पण ते गंभीर असू शकते.5 जर तपासणी न केल्यास, क्वचित प्रसंगी लिव्हर निकामी होणे आणि मृत्यू यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. या आजाराचा उद्रेक जगभरात झाला आहे, विशेषत: कमी स्वच्छतेच्या क्षेत्रात त्याचे प्रमाण जास्त आहे6. म्हणूनच, ज्यांना लहानपणी या विषाणूची लागण झालेली नाही, अशा शहरी स्वच्छ भागात राहणाऱ्यांना तारुण्यात आणि प्रौढ वयात गंभीर संक्रमण होण्याचा धोका असतो.

    त्याचा प्रसार कसा होतो?

    हिपॅटायटीस ए विषाणुमुळे दूषित झालेल्या पाणी आणि अन्नामुळ् हेपेटायटीस ए चा प्रसार होतो. हे प्रामुख्याने तोंडाद्वारे पसरते किंवा किंवा स्वच्छता न ठेवलेले दूषित पाणी, दूध किंवा अगदी तयार केलेले किंवा साठविलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे हा आजार पसरतो.

    जर आपण चुकून हिपॅटायटीस ए सह दूषित झालेले काहीतरी खाल्ले, एखाद्या संक्रमित मुलाचे डायपर बदलणे आणि नंतर आपले हात न धुतल्यास तुम्हाला हिपॅटायटीस ए होण्याचा धोका आहे. आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये संक्रमित व्यक्तीकडून स्पर्श झालेले अन्न आणि ड्रिंक शेअर केल्यास किंवा एखाद्या दाराच्या हॅंडल किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्यास आपल्याला हिपॅटायटीस ए होण्याचा धोका असू शकतो.

    हिपॅटायटीस ची चिन्हे आणि लक्षणे

    संक्रमित झालेल्या प्रत्येकात लक्षणे दिसतीलच असे नाही. संक्रमण झाल्यानंतर साधारणत: 2 ते 6 आठवड्यांच्या आत लक्षणे (जर विकसित झाली तर) दिसून येतात. त्यात खालील लक्षणांचा समावेश असू शकतो:

    • ताप
    • उलटी
    • राखाडी रंगाचा मल
    • थकवा
    • पोटदुखी
    • सांधे दुखी
    • भूक न लागणे
    • मळमळ
    • कावीळ

    लक्षात ठेवा, संसर्ग झालेला प्रत्येकात सर्व लक्षणे दिसून येत नाहीत. काही प्रकरणांमध्ये, लक्षणे 6 महिन्यांपर्यंत दिसू शकतात9

     

    हिपॅटायटीस - प्रतिबंधित केला जाऊ शकतो?

    होय, हिपॅटायटीस ए संसर्गापासून बचाव होऊ शकतो. स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेः

    1. स्वच्छ पाणी प्या आणि अन्न चांगले शिजवा. कच्चे मांस आणि शेलफिश टाळा आणि फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्यात धुवा.
    2. वारंवार साबणाने हात धुवा. विशेषत: टॉयलेटला जावू आल्यानंतर, लहान मुलांचे डायपर बदलल्यानंतर जेवण बनवण्यापुर्वी साबणाने हात धुवा.
    3. तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
    4. लसीकरणामुळे तुमच्या मुलाचे हिपॅटायटीस ए पासून संरक्षण होण्यास मदत होते.

     

    हिपॅटायटीस साठी उपचार?

    हिपॅटाटयटीस ए साठी विशिष्ट उपचार नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोगाचा प्रतिबंध करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

    हिपॅटायटीस ची लस कधी घ्यावी?

    एक वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना हिपॅटायटीस ए ची लस द्यावी. म्हणूनच, WHO आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या जागतिक आणि राष्ट्रीय आरोग्य संघटना सर्व पात्र मुलांना हिपॅटायटीस ए लसीकरणाची शिफारस करतात. अधिक माहितीसाठी बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या1,7.

    संदर्भ:

    1. https://www.who.int/immunization/position_papers/PP_hep_A_july2012_summary.pdf , Accessed on 24th July 2021
    2. https://www.cdc.gov/hepatitis/Hepatitis%20A/afaq.html , Accessed on 24th July 2021
    3. Castaneda D, Gonzalez AJ, Alomari M, Tandon K, Zervos XB. From hepatitis A to E: A critical review of viral hepatitis. World J Gastroenterol. 2021;27(16):1691-1715
    4. https://www.cdc.gov/vaccines/pubs/pinkbook/hepa.html, Accessed on 24th July 2021
    5. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/hepatitis-a, Accessed on 24th July 2021
    6. https://www.iamat.org /country/india/risk/hepatitis-a, Accessed on 24th July 2021
    7.                124587-IAP-GUIDE-BOOK-ON-IMMUNIZATION-18-19.pdf (iapindia.org), Accessed on 29th July 2021

    अस्वीकरण: GlaxoSmithKline फार्मास्युटिकल्स लिमिटेडने जनहितार्थ जारी केले. डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400 030, भारत. येथे दिसणारी माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. येथे कोणताही वैद्यकीय सल्ला दिला जात नाही. कृपया तुमच्या तब्येतीविषयी कोणतीही समस्या किंवा शंका, तसेच वैद्यकीय समस्यांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कृपया लसीपासून बचाव करण्यायोग्य रोगांच्या संपूर्ण यादीसाठी आणि प्रत्येक रोगासाठी लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकांसाठी आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या. कृपया GSK उत्पादनाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास कंपनीला india.pharmacovigilance@gsk.com वर कळवा.

    This article has been created by the Studio18 team on behalf of GSK

    CL code: NP-IN-HAV-OGM-210003 , DoP Jul 2021

    First published: