Home /News /news /

कारवाई थांबवण्यासाठी आयुक्तांना फोन करणारा 'तो' नेता कोण ?

कारवाई थांबवण्यासाठी आयुक्तांना फोन करणारा 'तो' नेता कोण ?

कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलाय.

05 जानेवारी, मुंबई : कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलाय. विशेष म्हणजे पालिका सभागृहातच त्यांनी हा गंभीर आरोप केल्याने कमला मिल आग दुर्घटनेचं गांभिर्य आणखीनच वाढलंय. अर्थात आयुक्तांनी या नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी हॉटेलमालकावरील कारवाई थांबवण्यासाठी थेट पालिका आयुक्तांवर दबाव टाकणारा 'तो' नेता कोण ? याचीच चर्चा बीएमसी पालिका वर्तुळात सुरू झालीय. गेल्या 28 डिसेंबरला मुंबईतल्या कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबाव्ह या दोन हॉटेलमध्ये आग लाग लागल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली होती. पण हीच ऑन द स्पॉट कारवाई थांबवण्यासाठी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना एका नेत्याने फोन केला होता. स्वतः पालिका आयुक्तांनीच हा गौप्यस्फोट केल्याने मुख्यमंत्री या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का ? असा प्रश्न विरोधक विचारताहेत.
First published:

Tags: Ajoy meheta, Bmc commisoner, अजॉय मेहता, आग दुर्घटना, कमला मिल, पालिका आयुक्त

पुढील बातम्या