ऑनलाईन शॉपिंग करणं या डॉक्टरांना पडलं महाग; 'डील ऑफ द डे'च्या नादात असे गमावले 2.62 लाख

ऑनलाईन शॉपिंग करणं या डॉक्टरांना पडलं महाग; 'डील ऑफ द डे'च्या नादात असे गमावले 2.62 लाख

जोधपूर, 30 एप्रिल : ऑनलाइन लुबाडणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होतच आहे. फक्त 399 रुपयांची बॅग खरेदी करण्याच्या नादात 'डील ऑफ द डे'च्या चक्रव्युहात अडकलेल्या एका डॉक्टरसाहेबांना थोडा थोडका नव्हे तर 62 लाखांचा चूना लागला.

  • Share this:

जोधपुर, 30 एप्रिल : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होतच आहे. फक्त 399 रुपयांची बॅग खरेदी करण्याच्या नादात 'डील ऑफ द डे'च्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका डॉक्टरसाहेबांना थोडा थोडका नव्हे तर 62 लाखांचा चुना लागला. ''करायला गेले एक आणि झाले भलतेच'' याची त्यांना प्रचिती आली, तेव्हा त्यांनी आधी वकिलाकडे आणि नंतर पोलिसांकडे धाव घेतली.

जोधपूर पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन सर्च करताना डॉक्टर तेजस यांना 399 रुपयांची एक बॅग आवडली. ती खरेदी करण्यासाठी म्हणून माहिती भरताच दिल्लीतल्या 'क्लासिक एंटरप्राइजेस' मधून श्रेया नावाच्या मुलीचा त्यांना फोन आला. तिने डॉक्टर तेजस यांना 'डील ऑफ द डे' स्कीमबाब माहिती दिली. त्यातील ठराविक वस्तू खरेदी केल्यास हमखास LED TV, लॅपटॉप आणि iPhone सारखी गिफ्ट मिळतील असं तिने डॉक्टर तेजस यांना सांगितलं.

त्यावर विश्वास ठेवत डॉक्टर तेजस यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिने सांगितलेल्या वेबसाइटवरून 399 रुपयांची बॅग खरेदी केली. मात्र, चार दिवसानंतर त्यांना परत एक फोन आला. तुम्ही 72 हजार रुपयांचा एक लॅपटॉप जिंकला असून त्यासाठी तुम्हाला 5,580 रुपये GST द्यावा लागेल असं सांगण्यात आलं. महागडा लॅपटॉप जिंकल्याच्या आनंदात त्यांनी ताबडतोब आपल्या क्रेडिट कार्डद्वारे जीएसटी म्हणून सांगण्यात आलेली रक्कम भरून टाकली.

त्यानंतर आणखी वेगवेगळ्या गिफ्ट्स आणि त्यासाठीचे नियम सांगणारे अनेक फोन डॉक्टर तेजस यांना आले आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून 2.62 लाख रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच डॉक्टर तेजस यांनी आधी पोलिसांत तक्रार देण्याऐवजी वकिलाकडे धाव घेतली आणि दिल्लीतल्या 'क्लासिक एंटरप्राइज'विरुद्ध दावा ठोकला. मात्र, कोणताच रिप्लाय न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जोधपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

First published: April 30, 2019, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading