Home /News /news /

Instagram वर पोस्ट शेअर करीत करीत झाली फरारीची मालकीण; आता कोटींमध्ये कमाई

Instagram वर पोस्ट शेअर करीत करीत झाली फरारीची मालकीण; आता कोटींमध्ये कमाई

अनेकदा लोक मजा मस्ती म्हणून इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करीत असतात. मात्र यातून कोट्यवधीही होता येऊ शकतं.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून नाव कमावणं, प्रसिद्ध होणे आणि फॅन फॉलोइंग वाढविणाऱ्यांची कमतरता नाही. चांगलं बोलणं, सुंदर चेहरा, शरीर, याच्या माध्यमातून प्रेक्षक मिळवले जातात. फक्त याची पद्धत तुम्हाला कळायला हवी. ज्याला नेमकं प्रेक्षकांची नस कळाली त्याला यश नक्कीच. मियामी, फ्लोरिडा( Miami, Florida) मध्ये राहणारी 28 वर्षीय एलेक्सा डेलनाज (Alexa Dellanos) असंच एक नाव आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो चाहते तर आहेत, शिवाय बँक अकाऊंटमध्येही कोट्यावधी रुपये आहेत. एलेक्सा इंन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध मॉडेल आहे. मजा मस्ती म्हणून इन्स्टावर आलेल्या एलेक्साचं बँक अकाऊंटवरील रक्कम पाहून धक्काच बसेल.  सोशल मीडियावर आपल्या फोटोच्या जीवावर एलेक्सा 65,000 डॉलर म्हणजेच इंडियन करन्सीत 48 लाखांहून अधिक कमाई केली आहे. तिचं सौंदर्य, ग्लॅमर, अदा आणि फिगरची चाहत्यांवर भूरळ आहे. आता तर तिचा बँक बॅलेन्स पाहून लोकांना वेड लागायची वेळ आली आहे. तसं पाहता मॉडेल नेहमी आपल्या फिरण्याचे, हॉटेल-रेस्टॉरंट, बीच, पार्टी अशा विविध ठिकाणचे फोटो शेअर करते. मध्यंतरी एलेक्साच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 6 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. या काळात तिने फरारीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. एकीकडे एलेक्साचं सौंदर्य आणि मागे पांढरी फरार पाहून चाहत्यांनी याला खूप पसंती दिली. ‘Meet me downtown’ कॅप्शनमुळे फॅन आनंदी सफेद फरारी (Ferrari) सह उभी 28 वर्षीय एलेक्साने फोटोला कॅप्शन दिलं आहे की, ‘meet me downtown’. म्हणजेच मला या शहरात भेटा. या आमंत्रणामुळे अनेक चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली. एलेक्साने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. ती म्हणते जर ती पत्रकार (journalist) झाली तर ती आपल्या कमाईचा तीन टक्के भाग सोशल मीडियामधून कमावते. तिला आता यातच लक्ष द्यायचं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Instagram

    पुढील बातम्या