राजीनाम्यानंतर पवारांची पत्रकार परिषदही झाली पण अजित पवार आहेत कुठे?

राजीनाम्यानंतर पवारांची पत्रकार परिषदही झाली पण अजित पवार आहेत कुठे?

अहमदनगर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके गेले कुठे हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. अजित पवार मुंबईत आहेत की पुण्यात आहेत?

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे एकच राजकीय खळबळ उडाली. शुक्रवारी संध्याकाळी सगळेच कार्यकर्ते त्यांना शोधत होते. यावेळी त्यांचा फोनही बंद होता. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या राजीनाम्याविषयी मोठा खुलासा केला. त्यानंतर शरद पवार हे पुणे दौरा रद्द करून मुंबईकडे अजित पवार यांची चर्चा करण्यासाठी निघाले असल्याची चर्चा सुरू झाली. पण अद्याप अजित पवार कुठे आहेत. याविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

अहमदनगर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके गेले कुठे हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.  अजित पवार मुंबईत आहेत की पुण्यात आहेत? अशा चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार अहमदनगरच्या अंबालिका कारखान्यात असल्याची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये अंबालिका शुगर नावाने अजित पवार यांचा साखर कारखाना आहे. ते जेव्हा नाराज होतात किंवा अशा काही घटना घडतात तेव्हा अजित पवार या कारखान्यावर येतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, ते पुणे दौरा सोडून मुंबईकडेही रवाना झाले पण अजित पवार कुठे आहेत याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजूनही अजित पवार कुठे आहेत? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.

इतर बातम्या - राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...; पवारांचा उदयनराजेंना टोला!

दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शरद पवार आपला पुणे दौरा अर्धवट टाकून मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेनंतर शरद पवार हे मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अजित पवार हे मुंबईत आहेत का? असं विचारलं जात आहे. अजित पवारांची भेट घेऊन ते त्यांचं मन वळविणार आहेत. रात्री उशीरा शरद पवार हे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता होती. अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय हा कुणालाही न विचारचात घेतला. त्यांनी सल्लामसलत केली नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. तसंच सध्याच्या राजकारणाला अजित पवार हे कंटाळले आहेत. त्यामुळे राजकारण सोडून आता शेती किंवा उद्योग करावा असं त्यांच्या मनात असल्याचंही पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे अजित पवार हे संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जातोय.

इतर बातम्या - शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ यांचं भावनिक टि्वट, म्हणाले...

अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय. अजित पवारांनी या निर्णयाची कल्पना कुणालाच दिली नव्हती असं आता स्पष्ट झालंय. खुद्द शरद पवारांनीच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.  माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राजकारणाची पातळी खालावली याचंही त्यांना दु:ख होतं. ज्या शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था  उत्तमपणे चालवल्या त्या कामावरच डाग लागल्याने अजित पवार हे अतिशय अस्वस्थ होते. एवढं काम करूनही जर असं होत असेल तर त्यापेक्षा आपण शेती आणि उद्योग करू असं त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे अजित पवारांचे हे राजकारणाचे संकेत आहेत का अशी आता चर्चा सुरू झालीय.

शरद पवार पुढे म्हणाले, अजित पवारांचा आक्रमकपणे आणि घाईने निर्णय घेण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा. माझा अजित पवारांशी संपर्क झाला नाही. मात्र कुटुंब प्रमुख म्हणून मी अजित पवारांशी बोलून त्यांची समजूत काढेण असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही कुटुंबप्रमुख म्हणून मी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरूध्द जरी असली तरी त्यांनी ती ऐकलीय. आताही ते ऐकतील असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या