एअर स्ट्राईकवरून पुन्हा दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

पुलवामा हल्ल्यानंतर पाकने वारंवार आपली भूमिका बदलली...

  • Share this:

भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये विमान घुसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुरूवातीला भारताचे विमान पाडल्याचा दावा केला पण नंतर लगेच आमचा हात नसल्याचेही जाहीर केलं होतं.

भारताचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने त्यांना परत पाठवले. यावेळीही पाकिस्तानने शांततेचा प्रस्ताव असल्याचं म्हटलं होतं. मात्र, अभिनंदन हे युद्घकैदी होते आणि ते जिनिव्हा करारानुसार भारतात परतले आहेत.

यानंतरही पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे. त्यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतली नसल्याचा दावा केला आहे. याचबरोबर भारताच्या एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत दिशाभूल करण्याचाही पाकिस्तानकडून केला जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश ए मोहम्मदच्या पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला. यात 300 दहशतवादी ठार झाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या बालाकोटमध्ये भारताच्या हवाई दलाने घुसून कारवाई केली. यानंतर बालाकोटमधील स्थानिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मोठ्या संख्येने दहशवादी ठार झाल्याचा दावा योग्य नसल्याचं पाकिस्तानमधील स्थानिकांनी म्हटले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बालाकोटमधील जाबा येथे राहणाऱ्या नूर शाह यांनी म्हटले की, भारताला दहशतवाद्यांना मारायचे होते. पण तुम्हाला इथे कुठे दहशतवादी दिसतात का? एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह कुठे आहेत? इथं राहतो म्हणून आम्ही दहशतवादी होतो का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

भारताने जैश ए मोहम्मदच्या अल्फा 3 या कंट्रोल रूमला नेस्तनाबूत केल्याचा दावा केला होता. जैशनेच पुलवामातील सीआरपीएफ ताफ्यावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

पाकिस्तानने भारताच्या या दाव्याला फेटाळून लावलं होतं. भारताचा एअर स्ट्राईक अयशस्वी झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. भारताने रिकाम्या जागांवर बॉम्ब फेकल्याचा हास्यास्पद दावा पाकिस्तानने केला होता.

दरम्यान रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्ब हल्ल्यानंतर भाग हादरला होता. पण यात जिवित हानी झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच एअर स्ट्राईक केला त्या परिसरातील रुग्णालयात कोणीही जखमी व्यक्ती आला नसल्याचे एका कर्मचाऱ्याने म्हटले होते.

त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी, प्रशिक्षक आणि कमांडर ठार केल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले होते.

व्हाईस एअर मार्शल आरजीके कपूर यांना एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, याबद्दलची माहिती देणं सद्यपरिस्थितीत योग्य ठरणार नाही. भारताजवळ एअर स्ट्राईकचे पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 11:34 AM IST

ताज्या बातम्या