Home /News /news /

10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा

10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा

कोरोना परिस्थितीमुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता.

पुणे, 23 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यातच 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार याची सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहून होते. अखेर, राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेचा अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे. 12 वीचा निकाल 15 जुलै दरम्यान तर 10 वीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती राज्य मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान ही माहिती देण्यात आली. हेही वाचा -धोका वाढला! माजी आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण कोरोना परिस्थितीमुळे  पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते. महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परीक्षा पूर्ण झाली होती. मात्र, 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे. असे पाहा निकाल निकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील. हेही वाचा -कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: दहावीचा निकाल, बारावीचा निकाल

पुढील बातम्या