Inside Photos- कधीकाळी विकी कौशल असाही दिसायचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही

आतापर्यंत तुम्ही विकी कौशलचे हे लहानपणीचे आणि सुपरस्टार्ससोबतचे फोटो नक्कीच पाहिले नसतील.

  • Share this:

‘लव शव ते चिकन खुराना’, ‘बॉम्बे वेल्वेट’सारख्या सिनेमांमध्ये विकी कौशलने काम केलं आहे हे फारच कमी लोकांना माहीत असले. २०१५ मध्ये आलेल्या ‘मसान’ सिनेमामुळे त्याला ओळख मिळाली. आज बॉलिवूडचा स्टार विकी कौशल त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ मे १९८८ मध्ये मुंबईत विकीचा जन्म झाला.

कधीकाळी नवोदित असलेला विकी आज बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला असून बॉलिवूडच्या टॉप यादीतील कलाकारांना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, विकी लहान असतानाच तो बॉलिवूडच्या दिग्गज लोकांसोबत दिसला आहे.

विकीचे वडील श्याम कौशल हे ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करायचे. आता श्याम कौशल हे दिग्दर्शनातही उतरले आहेत. इन डॉट कॉमशी बोलताना श्याम यांनी विकीच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

श्याम म्हणाले की, ‘विकीला मी पहिल्यांदा अशोका सिनेमाच्या सेटवर घेऊन गेलो होतो. त्या सिनेमाच्या अक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर होती. त्य सिनेमात मी एक छोटीखानी भूमिका करावी अशी शाहरुखची इच्छा होती.’

‘ज्या दिवशी मी पहिल्यांदा कॅमेऱ्या समोर उभं राहून अभिनय करणार होतो त्यादिवशी मी विकीला घेऊन सेटवर गेलो होतो. तेव्हा तो १२ वर्षांचा होता. आपल्या बाबांना अभिनय करताना पाहण्यासाठी तो फार उत्सुक होता.’

‘लहान असताना विकी हृतक रोशनलाही भेटला होता. विकीने हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा पाहिला होता. हा सिनेमा पाहूनच विकीला हृतिक आवडायला लागला होता. तेव्हा मी हृतिकसोबत फिजा सिनेमात काम करत होतो. तेव्हा मी विकीला आणि सनीला दोघांनाही दुसऱ्या दिवशी सेटवर घेऊन गेलो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 12:52 PM IST

ताज्या बातम्या