कोरोनाची लस कधी, कोणाला व कशी देणार? प्रत्येक प्रश्नाचं सरकारने दिलं उत्तर, वाचा सविस्तर

कोरोनाची लस कधी, कोणाला व कशी देणार? प्रत्येक प्रश्नाचं सरकारने दिलं उत्तर, वाचा सविस्तर

कोरोना विषाणू (Coronavirus) महासाथीमध्ये आता सर्वचजण लसीची उत्सुकतेने वाट पाहत आहे. अनेक कंपन्यांची कोरोना लशीची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : कोरोना विषाणू (Coronavirus) महासाथीमध्ये आता सर्वचजण लसीची उत्सुकतेने वाट पाहत आहे. अनेक कंपन्यांची कोरोना लशीची (Corona Vaccine) चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची तयारीही जलद झाली आहे. या सर्वांमध्ये लस आणि लसीकरणाबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा काही प्रश्नांची उत्तरे आरोग्य मंत्रालयाने दिली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, लशीकरणाची ट्रायल शेवटच्या टप्प्यात आहे. भारत सरकार लस लॉन्च करण्यासाठी तयार आहे. सर्वांना लस एकत्र उपलब्ध करण्यात येईल? या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, सरकारने प्राधान्यांच्या आधारे गटांची निवड केली आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे, त्यांना प्रथम लस दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरियर्सना प्रथम लस दिली जाईल. यानंतर, दुसऱ्या गटात 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक आणि कोमॉर्बिड कंडिशन्सच्या 50 वर्षांच्या कमी वयाच्या लोकांसाठी होईल.

स्वास्थ मंत्रालयाने सोबत असंही सांगितलं की, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सुरुवातील लस दिली जाऊ शकते. मात्र ते लशीच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येतील. व्यक्तीच्या शरीरात लस दिल्याच्या दोन आठवड्यांनंतर पुरेशा प्रमाणात अॅन्टीबॉडी विकसित होतील. भारतात येणारी लस ही इतर देशांइतकीच प्रभावी ठरणार आहे. लसीकरण अनिवार्य असेल किंवा त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असेल याबाबत आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ते एच्छिक असेल.

लशीच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या प्रश्नांवर आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, रेग्युलेटरी बॉडीज करुन क्लिअरन्स मिळाल्यानंतरच देशात लस उपलब्ध केली जाईल. मंत्रालयाने पुढे असंही सांगितलं की, ड्रग रेग्युलेटर क्लिनिकल ट्रायल्सच्या डेटाचा तपास करीत आहेत. तपासणीनंतर सुरक्षित आणि प्रभावी लशीला लायसन्स दिलं जाईल. लशीकरणाच्या प्रक्रियेबाबत मंत्रालयाने सांगितलं की, जे लोक लशीकरणासाठी योग्य असतील त्यांना रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर माहिती दिली जाईल. रजिस्ट्रेशनशिवाय कोणाचही लशीकरण केलं जाणार नाही. रजिस्ट्रेशन ऑनलाइन होईल. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नोंदणीच्या वेळी मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पॅनकार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयातील पासबुक, पासपोर्ट, पेन्शन संबंधित कागदपत्रे, सरकारी कर्मचारी ओळखपत्र किंवा खासदार, आमदार, विधानपरिषदेच्या सदस्यांचं एक ओळखपत्राची गरज लागेल. नोंदणीच्या वेळी देण्यात आलेला आयडी देखील लसीच्या वेळी द्यावा लागेल.

लशीकरणानंतर अर्धा तास तिथेच थांबा

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीला तिथे अर्धा तास थांबावे लागेल. काही समस्या वाटत असल्यास आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. जेव्हा सुरक्षित असल्याचं वाटेल, तेव्हाच लस दिली जाईल. राज्यांना लशीशी संबंधित असलेल्या दुष्परिणामांसाठी तयार राहण्यास सांगितले गेले आहे. कोरोना पेशंट किंवा संशयित रुग्णाला लक्षणं बंद झाल्याच्या 14 दिवसानंतर दिली जाईल. लशीचं वेळापत्रक पूर्ण करणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की व्यापक लोकसंख्येला लस देण्यासाठी फ्रेमवर्क अधिक बळकट केले जाऊ शकते.

Published by: Meenal Gangurde
First published: December 18, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या