काँग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियंका चोप्राच्या नावाने घोषणा, पाहा व्हायरल VIDEO

काँग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियंका चोप्राच्या नावाने घोषणा, पाहा व्हायरल VIDEO

काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी मंचावर प्रियांका गांधी ऐवजी प्रियंका चोप्रा जिंदाबादचा जयघोष केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या एका रॅलीच्या वेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या जागी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या घोषणा देण्यात आल्यात. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले, परंतु अशीच घटना दिल्लीत झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात घडली. काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी मंचावर प्रियांका गांधी ऐवजी प्रियंका चोप्रा जिंदाबादचा जयघोष केला. मात्र, मंचावर उपस्थित नेत्याला आपली चूक लक्षात येताच प्रियंका गांधी जिंदाबादच्या घोषणा तत्काळ दुरुस्त केल्या.

प्रियंका गांधींच्या जागी प्रियंका चोप्राच्या घोषणा

दिल्लीतील काँग्रेसच्या रॅलीत व्यासपीठावर कार्यकर्त्यांना उत्तेजन देण्यासाठी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू होती. आधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर राहुल गांधींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. पण, प्रियंका गांधी यांचे नाव येताच माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी प्रियंका गांधीऐवजी प्रियंका चोप्रा जिंदाबादचा जयघोष केला. आमदाराला हे समजताच त्यांनी प्रियंका गांधी जिंदाबादचे घोषणाबाजी सुरू केली.

इतर बातम्या - पवारांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची हवा, लेकीला थेट हेलिकॉप्टरने धाडलं सासरी!

या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक यावर कमेंट्सही करत आहेत. दिल्ली प्रदेश काँग्रेसने या घटनेची दखल घेतली आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने न्यूज 18 हिंदीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे की हे नक्कीच पब्लिसिटी स्टंटच्या अंतर्गत केले गेले आहे. प्रियांका गांधी यांना प्रियांका चोप्रा म्हणू शकेल असा एकही काँग्रेस कार्यकर्ता नाही.

इतर बातम्या - हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा पुरावा, 48 तासांत आरोपींना गेम ओव्हर

Published by: Renuka Dhaybar
First published: December 1, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading