..तेव्हा मनमोहन सिंगांनी मारला होता जिन्नांना हाॅकीचा चेंडू !

..तेव्हा मनमोहन सिंगांनी मारला होता जिन्नांना हाॅकीचा चेंडू !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग सध्या बंगळुरूमध्ये आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा किस्सा सांगितला

  • Share this:

कर्नाटक, 07 मे : अलीगड मुस्लिम महाविद्यालयामध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या फोटोवरून वाद पेटलाय. भारतात जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार धरलं जातं पण पाकिस्तानमध्ये त्यांना राष्ट्रपिता म्हणून मानतात. जिन्ना यांच्याबद्दलचा एक किस्सा खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितला.

आज देशात काही अशी लोकं आहेत जी जिन्ना यांच्यासोबत भेटीबद्दल बोलू शकतात. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. 1945 मध्ये मनमोहन सिंग यांची जिन्ना यांच्यासोबत लाहौरमध्ये भेट झाली होती.

अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांची जगभरात ओळख आहे. काॅलेजच्या दिवसात मनमोहन सिंग यांना हाॅकी खेळण्याचा छंद होता. एकेदिवशी हाॅकी खेळताना मनमोहन सिंग यांनी टोलावलेला चेंडू जिन्ना यांना लागला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग सध्या बंगळुरूमध्ये आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा किस्सा सांगितला. "मी जिन्नांना 1945 मध्ये लाहौरमध्ये भेटलो होतो. ते माझ्या घराजवळच राहत होते. आम्ही त्यांच्या घराजवळ हाॅकी खेळत होतो. एक दिवस ते आमचा हाॅकीचा सामना पाहत होते. तेव्हा मी स्टिकने चेंडू टोलावला तो जिन्नांना लागला होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणतीही इजा झाली नाही."

First published: May 7, 2018, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading