मुंबई, 21 मार्च : 70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार जितेंद्र यांनी 1974 मध्ये आपल्या बालपणीच्या प्रेमिका शोभा कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांनी शोभासोबत लग्न थाटामाटात केले. पण, शोभाच्या आधी जितेंद्र 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीसोबत लग्न करणार होते. दोघांचे लग्न मद्रासमध्ये झाले असते, जर धर्मेंद्र येथे पोहोचले नसते. जर दोघांचं लग्न झालं असतं तर आज परिस्थिती काहीशी वेगळी दिसली असती. या संपूर्ण घटनेचा उल्लेख हेमा मालिनी यांच्या चरित्र 'हेमा मालिनी : बियॉन्ड द ड्रीम गर्ल'मध्येही करण्यात आला आहे. काय घडलं नक्की तेव्हा जाणून घ्या...
खरे तर हेमा मालिनी यांचे कुटुंबीय धर्मेंद्रसोबत लग्नासाठी तयार नव्हते. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न जितेंद्रसोबत करण्याचा निर्णय घेतला. जितेंद्रच्या मनात हेमाबद्दल आधीच सॉफ्ट कॉर्नर होता, असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीत तोही लग्नासाठी तयार झाला. मात्र, हेमाने कधीही त्याच्यात रस दाखवला नाही. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते पण त्यांच्यात प्रेम नव्हतं.
एकेकाळी छोट्या मोठ्या भूमिका करायचे हे कलाकार; वेबसीरीजमुळे रातोरात बदललं नशीब
दोघांच्या या मैत्रीवर धर्मेंद्र फारसे खूश नव्हते. एकदा नाराज होऊन धर्मेंद्र जितेंद्र आणि हेमामालिनीच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि बराच गोंधळ घातला. यानंतर हेमाच्या आईने कसे तरी तिला जितेंद्रच्या आई-वडिलांना भेटायला लावले. या लग्नामुळे जितेंद्रचे कुटुंब खूप आनंदी होते आणि अभिनेत्यानेही लग्नाला संमती दिली होती.
पण, त्यांच्या लग्नाच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या आणि धर्मेंद्र यांनाही याची माहिती मिळाली. जितेंद्र आणि हेमाच्या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी लग्न थांबण्यासाठी मद्रास गाठलं. हेमाच्या वडिलांनी धर्मेंद्रला पाहताच रागाने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. पण, अभिनेत्याने जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि हेमाशी एकांतात बोलण्याची परवानगी मागितली. हेमाच्या वडिलांनी कसेतरी त्याला आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी दिली.
धर्मेंद्रला भेटल्यानंतर हेमा बाहेर येताच तिने आई-वडिलांकडे लग्नासाठी वेळ मागितल्याचे सांगितले जाते. त्याला अजून वेळ हवा आहे, असे ते म्हणाले. पण, अभिनेत्रीचे म्हणणे ऐकून जितेंद्रचे कुटुंबीय संतापले. त्याने हेमाला तिचा निर्णय स्पष्टपणे सांगण्यास सांगितले. अशा परिस्थितीत हेमाने या लग्नाला नकार दिला. जितेंद्र हा अपमान सहन करू शकला नाही आणि त्याने कुटुंबासह तिथून माघार घेतली, असे सांगितले जाते.
त्यानंतर धर्मेंद्रने आपलं प्रेम मिळवत हेमा मालिनीसोबत 2 मे 1980 रोजी लग्नगाठ बांधली. आज दोघेही 40 वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत असून सुखाचा संसार करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.