VIDEO भावाने बहिणीला 'किस' केलं म्हणजे सेक्स होतो का? बिहारच्या नेत्याचं बेताल वक्तव्य

VIDEO भावाने बहिणीला 'किस' केलं म्हणजे सेक्स होतो का? बिहारच्या नेत्याचं बेताल वक्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या मांझी यांनी अनेकदा असे अकलेचे तारे तोडले आहेत.

  • Share this:

पाटना, 28 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जितनराम मांझी यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केलंय. लोकसभेतल्या आझम खान यांच्या वक्तव्यावर देशभरातून प्रचंड टीका होतेय. मात्र मांझी यांनी आझम खान यांचं वक्तव्य हे वाईट भावनेनं नव्हतं असं म्हटलंय. तरुणा भावाने बहिणीला किस केलं  किंवा अलिंगण दिलं तर तो काय सेक्स होतो का? आई मुलाचे लाड करते म्हणजे काय वेगळं असतं का? आझम खान यांचं वक्तव्यही त्याच प्रकारातलं होतं असे तारेही मांझी यांनी तोडलेत. या आधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा न देता माफी मागावी असंही ते म्हणाले.

लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाच्या चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला होता. त्यांनी लोकसभेच्या पदक तालिकेवरच्या अध्यक्षा रमा देवी यांच्याबदद्ल वैयक्तिक टिप्पणी केली होती.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात रस्त्याला गेले तडे, हायवे खचण्याची भीती?

काय म्हणाले आझम खान?

भाजपच्या खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्ष रमा देवी यांना उद्देशून आझम खान म्हणाले होते की, तुम्ही मला एवढ्या आवडता की मनात येतं तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावं.

आझम खान यांच्या या वक्तव्यावर लोकसभेच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. भाजपच्या मंत्र्यांनीही आझम खान यांनी याबदद्ल माफी मागावी, अशी मागणी लावून धरली होती. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझम खान यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. माझ्या 19 वर्षांच्या संसदेतल्या कारकिर्दीमध्ये मी लोकसभा अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीबद्दल असं वक्तव्य ऐकलं नव्हतं. खासकरून महिला लोकसभा अध्यक्षांबद्दल कुणीही असं विधान केलेलं नाही, असं ते म्हणाले होते.

मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे

देशभरातून टीका

यावर आझम खान यांनी, आपण कोणतंही असंसदीय विधान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं. रमा देवी या माझ्या बहिणीसारख्याच आहेत, असं ते म्हणाले. माझ्या विधानात जर काही अयोग्य आढळलं तर मी राजीनामा देईन, असंही त्यांनी ठासून सांगितलं होतं. यावर अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आझम खान यांच्या वक्तव्यामध्ये मला काही आक्षेपार्ह वाटलं नाही पण त्यांचं विधान असंसदीय असेल तर ते कामकाजातून वगळून टाकावं, असं त्यांनी म्हटलं होतं. नंतर लोकसभेतल्या सर्वच पक्षांच्या सदस्यांनी खान यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली आणि कारवाईची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Azam Khan
First Published: Jul 28, 2019 10:10 PM IST

ताज्या बातम्या