मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /हे वर्षा तुझा रंग कोणता रे..'मास्क' ब्लू? आणि 2021, तुझा...?

हे वर्षा तुझा रंग कोणता रे..'मास्क' ब्लू? आणि 2021, तुझा...?

 पँटोन कंपनी गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ कलर ऑफ दी इयर अर्थात वर्षासाठीच्या खास रंगाची घोषणा करते. त्यातून जगभरातले ट्रेंड्स लक्षात येतात. तसंच फॅशन (Fashion), औद्योगिक आणि इंटीरिअर डिझाइन (Interior Design) यांसारख्या क्षेत्रांतल्या विविध उत्पादनांच्या निर्मितीवर या घोषणेचा परिणाम होतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : सर्जिकल मास्क (Surgical Mask) ही केवळ डॉक्टर्सपुरतीच मर्यादित असलेली गोष्ट यंदाच्या (2020) मार्चपासून अचानक सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनली. आता मास्क वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत; मात्र सर्जिकल मास्कच्या खऱ्या रंगाला जर काही नाव द्यायचं असेल, तर ते ‘मास्क ब्लू’ (Mask Blue) असं असू शकतं. यंदाच्या वर्षाचा रंग (Colour of The Year) कोणता, असा प्रश्न विचारला गेला, तर त्याचं उत्तरही ‘मास्क ब्लू’ असंच दिलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण एक प्रकारे त्या रंगाने आपलं जीवनच व्यापून टाकलं आहे.

कलाकार आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आर्टेम पोझद्निअॅकोव्ह (Artem Pozdniakov) यांनी याच संकल्पनेचा कलात्मक वापर करून मास्कवापराबद्दलची जनजागृती सोशल मीडियाद्वारे करायचा प्रयत्न अलीकडेच केला होता. ‘दुसरी लाट... आणि ती पहिल्या लाटेपेक्षा मोठी आहे. तेव्हा कृपा करून हा रंग परिधान करा. हाच मुख्य ट्रेंड आहे,’ अशी ओळ त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी केलेल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये लिहिली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी प्रसिद्ध पँटोन स्क्वेअर (Pantone Square) सर्जिकल मास्कच्या निळ्या रंगात प्रसिद्ध केला होता.

आता 2020 हे वर्ष संपत आलं आहे आणि पँटोनतर्फे नव्या वर्षाचे म्हणजेच 2021चे कलर्स ऑफ दी इयर (Colours of The Year) जाहीर झाले आहेत. त्या औचित्याने आर्टेम यांची ती पोस्ट पुन्हा सोशल मीडियावर झळकली.

2021साठी दोन ‘कलर्स ऑफ दी इयर’

2021च्या कलर ऑफ दी इयरची घोषणा नऊ डिसेंबरला पँटोनकडून करण्यात आली. तो एकच रंग नसून, दोन वेगवेगळे रंग (Contrast) आहेत. चकाकणारा पिवळा (Illuminating Yellow) आणि राखाडी (Grey). आशावाद आणि शांतता यांचे निदर्शक असलेले हे दोन रंग आहेत. एकटा ग्रे रंग निवडला असता, तर साचलेपणा आणि निराशा प्रतीत झाली असती. तसंच एकट्या पिवळ्या रंगाची निवड केली असती, तर जास्तच उबदारपणा त्यातून व्यक्त झाला असता. दोन्ही रंगांची जोडी आशावाद आणि विचारीपणा यांची निदर्शक आहे, असं ‘फास्ट कंपनी’नं म्हटलं आहे.

पँटोन कंपनी गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ कलर ऑफ दी इयर अर्थात वर्षासाठीच्या खास रंगाची घोषणा करते. त्यातून जगभरातले ट्रेंड्स लक्षात येतात. तसंच फॅशन (Fashion), औद्योगिक आणि इंटीरिअर डिझाइन (Interior Design) यांसारख्या क्षेत्रांतल्या विविध उत्पादनांच्या निर्मितीवर या घोषणेचा परिणाम होतो.

2020चा कलर ऑफ दी इयर म्हणून क्लासिक ब्लू (Classic Blue) अर्थात निळ्या रंगाची घोषणा पँटोन कंपनीतर्फे गेल्या वर्षी झाली होती. ‘संध्याकाळच्या विशाल आकाशाचा असलेला निळा रंग अमर्यादित आणि उत्तेजना देणारा आहे,’ असं त्यांनी त्या वेळी म्हटलं होतं. योगायोगाने यंदा सर्जिकल मास्कच्या रूपाने निळा रंगच सर्वांत वापरला गेला.

First published:

Tags: Coronavirus, Mask