Elec-widget

'या' स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; जूननंतर नाही मिळणार अपडेट्स

'या' स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; जूननंतर नाही मिळणार अपडेट्स

Windos फोन वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : WhatsApp हे जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं मॅसेजिंग अॅप आहे. गुगल प्ले स्टोअर असो वा अॅपल स्टोअर दोन्ही प्लॅटफॉर्मवरू कोट्यवधी लोकांनी हे अॅप डाउनलोडक केलं आहे. पण हे अॅप वापरणाऱ्या काही युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. विंडोज फोनसाठीचं शेवटचं अपडेट जूनमध्ये येणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2020 पासून विंडोज फोन वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही असंही या ब्लॉगमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

जुन्या झालेल्या फोनसाठी WhatsApp कधीच अपडेट देत नाही. याआधीचं सांगायचं झालं तर, जानेवारी 2018 मध्ये व्हॉट्सअॅपने नोकिया S40 आणि त्याआधीच्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या फोनला सपोर्ट करणं बंद केलं होतं. जुन्या किंवा आउटडेटेड झालेल्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही फिचर्स डेव्हलप करत नाही असं व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लागमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळेच त्या फोनमधील व्हॉट्सअॅपची अनेक फिचर्स आपोआप बंद पडतात.

पुढल्या सात वर्षांवर फोकस केलं जात असल्यामुळे व्हॉट्सअॅपचं संपूर्ण लक्ष हे लाँच होणाऱ्या फोनवर आणि युजर्सवर असतं. जर तुमच्याकडे Windows फोन असेल आणि WhatsApp तुम्हाला वापरायचं असेल तर 31 डिसेंबर नंतर तुम्हाला नवा पर्याय निवडावा लागेल.

याआधी व्हॉट्सअॅपने अँड्रॉइडचं 2.3.7 व्हर्जन आणि त्याआधीची ऑपरेटिंग सिस्टिम, iOS 7 आणि त्याआधीची ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या iPhone वर सुद्धा 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप बंद होणा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, कंपनीने अद्याप अँड्रॉइडबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही.

याआधी व्हॉट्सअॅपने 31 दिसंबर 2017 पासून 'ब्लैकबेरी OS', 'ब्लैकबेरी 10', 'Windows Phone 8.0' आणि अशा जुन्या प्लॅटफार्म्सवर आधारित फोनसाठी WhatsApp बंद केलं होतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: May 9, 2019 02:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...