... म्हणून लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांचे झाले वांदे!

... म्हणून लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांचे झाले वांदे!

  • Share this:

04 मे : अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण आज रात्री अचानक व्हॉट्स अॅप बंद झाले. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असं झालं असावं, असं सगळ्यांना वाटत होतं, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्स अॅपची सेवा खंडित झाल्याचं वृत्त येऊ लागलं. संदेशवहनाचे महत्त्वाचे साधन बनलेले व्हॉटसअॅप  जगभरात गोंधळ उडाला.

दरम्यान, पहाटे 4 वाजल्यानंतर हळूहळू व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले.रात्री 2 ते 3. 30 च्या सुमारास  व्हॉट्स अॅपवर मेसेज येणं बंद झाले. सुरुवातीला हा काय प्रकार आहे हे कुणालाच कळेना. भारताबरोबरच इतर देशांमध्येही ही समस्या दिसून आली. मात्र भारतात यावेळी मध्यरात्र असल्याने फारसा गोंधळ उडाला नाही. पण  लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांचे वांदे झाले. तर इतर देशांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही सेवा हॅक तर झाली नाही ना अशी भीतीही व्यक्त होऊ लागली.

दरम्यान, "व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, आज जगभरातील काही भागांमध्ये व्हॉटअॅप सुरू करण्यात अनेक जणांना अडचणी येत आहे. ही समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र या प्रकारामुळे झालेल्या त्रासाबद्दल व्हॉट्सअॅप व्यवस्थापन दिलगीर आहे."

First published: May 4, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या