मित्रांची WhatsApp Story तुमच्या फोनमध्ये 'इथे' होते Save, अशी करा डाउनलोड

मित्रांने ठेवलेला स्टेटस फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का? मग त्याला मागण्याची गरज नाही

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 08:32 PM IST

मित्रांची WhatsApp Story तुमच्या फोनमध्ये 'इथे' होते Save, अशी करा डाउनलोड

मुंबई, 17 एप्रिल : मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा स्वतःचा व्हिडिओ किंवा फोटो लावायचा असेल तर आपण WhatsApp Story चा वापर करतो. मात्र, मित्रांने ठेवलेला स्टेटस फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर, 'तो' फोटो किंवा व्हिडिओ मित्राकडे मागण्याची गरज नाही.

पण, बरेचदा मित्रांनी ठेवलेलं स्टेटस आपल्याला जास्त आवडतं. त्यासाठी त्या मित्राकडे तो फोटो किंवा व्हिडिओ दे अशी विनवणी केली जाते. पण, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, तुमच्या मित्राच्या स्टेटस फिचरमध्ये लागलेला फोटो किंवा व्हिडिओ तुमच्याच मोबाईलमध्ये केव्हाच Save झालेला असतो.

हे शोधायचं असेल तर, सगळ्यात पहिले तुम्ही WhatsApp उघडा आणि त्यानंतर तो स्टेटस ओपन करा जो तुम्हाला तुमची स्टोरी म्हणून लावायचा आहे.

यानंतर तुम्हाला फाइल मॅनेजरमध्ये जावे लागेल. त्यानंतर WhatsApp मध्ये जाऊन Media सिलेक्ट करा. या ठिकाणी थंडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ‘Statuses’ ऑप्शन मिळेल. ते ओपन करताच तुम्हाला तुमच्या मित्रांचे सगळे स्टेटस दिसायला लागतील. त्यातलं हवं ते स्टेटस तुम्ही तुमच्या WhatsApp Story मध्ये लावू शकाल.


Loading...


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...