News18 Lokmat

WhatsApp लवकरच लाँच करणार 'हे' नवं अ‍ॅप; इतर डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सना देणार टक्कर

भारतात अॅप लाँच करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू - मार्क जुकरबर्ग

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 03:53 PM IST

WhatsApp लवकरच लाँच करणार 'हे' नवं अ‍ॅप; इतर डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सना देणार टक्कर

नवी दिल्ली, 5 मे : मार्क जुकरबर्ग यांनी इतर डिजिटल पेमेंट अॅप्सना टक्कर देण्यासाठी भारतात लवकरच ‘WhatsApp Pay’हे अॅप लाँच करणार असल्याची घोषणा केली. यासाठी युद्धस्तरावर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुळात या अॅपची निमिर्ती ही जागतिक बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येत असल्याचं जुकरबर्ग यांनी विश्लेषकांशी बोलताना स्पष्ट केलं. तुर्तास या अॅपचं भारतात टेस्टिंग सुरू आहे. ते यशस्वी झाल्यानंतरच हे अॅप अनेक देशात लाँच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागू शकतो याबाबत कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही.

वास्तविक पाहता कंपनीने गेल्या वर्षातच या अॅपचं बिटा टेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं. मात्र, भारतात स्थानिक पातळीवर डेटा स्टोअर करण्याची मागणी असल्यामुळे हे अॅप लाँच करण्यास वेळ लागत असल्याचं जुकरबर्ग म्हणाले.

इंस्टाग्राम, फेसबुक वरून मोठ्या प्रमाणत लोकं शॉपिंग करतात. भारतात मोठी बाजारपेठ आहे शिवाय लाखो लाहान-मोठे उद्योग आणि व्यवसाय आहेत, जे या सर्व गोष्टींचा पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी उपयोग करतात. ‘WhatsApp Pay’हे पेमेंट अॅप भारतीयांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: May 5, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...