व्हाटसअॅपच्या या युजर्सना मिळणार 1.8 कोटी रुपये

आता व्हॉटसअपनं युजर्ससाठी स्टार्टअप इंडिया ग्रँड चॅलेंज सुरू केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 03:20 PM IST

व्हाटसअॅपच्या या युजर्सना मिळणार 1.8 कोटी रुपये

जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप व्हॉटसअप अनेक नवनवी फिचर देत आहे. आता व्हॉटसअपनं युजर्ससाठी स्टार्टअप इंडिया ग्रँड चॅलेंज सुरू केलं आहे. हे चॅलेंज जिंकणाऱ्या युजरला 1.8 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

व्हॉटसअपने गुरूवारी भारत सरकारच्या स्टार्टअप इंडियासोबत भागिदारी केली. याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

व्हाटसअपनं म्हटलं आहे की, नव्या आणि कल्पक विचारांच्या व्यवसायाच्या कल्पना देणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर सामाजिक-आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही नवीन कल्पना देणाऱ्या व्यापाऱ्यांना हे चॅलेंज असणार आहे.

Loading...

रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवता येतील अशा व्यवसायाच्या नव्या कल्पना ज्यांच्याकडे असतील त्या युजर्सना या चॅलेंजमध्ये सहभागी होता येईल.

या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १० मार्च आहे. जर तुमच्याजवळ व्यवसाय वाढवण्यासाठी काही नव्या कल्पना असतील तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी आहे.

व्हाटसअपने सुरू केलेल्या या स्टार्टअप आयडिया चॅलेंजमध्ये AI, AR VR, अॅनालिटिक्स, फूड एंड बेवरेजेज, वेस्ट मॅनेजमेंट, मार्केटिंग से ट्रान्सपोर्टेशन, फॅशन या क्षेत्रातील व्यावसायिकांना सहभागी होता येणार आहे.

जगात व्हॉटसअॅपचे जवळपास 1 अब्ज 30 कोटी युजर्स आहेत. यात भारतीय युजर्सची संख्या 20 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षी व्हाटसअपने बिझनेस व्हॉटसअप सुरू केले आहे. त्याचा 50 लाख लोक वापर करत आहेत.

एका अहवालानुसार भारतात जवळपास 84 टक्के व्यापारी लघु आणि मध्यम वर्गातील आहेत. हे व्यापारी व्हॉटसअपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत आहेत.  तर 80 टक्के व्यापारी  बिझनेस व्हॉटसअपच्या मदतीने व्यवसाय वाढवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...