उन्हाच्या वाढत्या तडाख्यात तुमच्या स्मार्टफोनचा होऊ शकतो स्फोट, अशी घ्या काळजी

उन्हाच्या वाढत्या तडाख्यात तुमच्या स्मार्टफोनचा होऊ शकतो स्फोट, अशी घ्या काळजी

चार्जिंग सुरू असताना तुम्ही मोबाइलवर बोलता का?

  • Share this:

मुंबई, 8 मे : मोबाइलमध्ये स्फोट होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे जास्त वाढ झाली आहे. घडलेल्या अशा घटनांचे वृत्त आपण नेहमी एकतो आणि वाचतो. तुम्हाला माहित आहे का असं का होतं? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे फोनची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे ती फुटते. तसंच जास्त उष्णतामानामुळेही असा प्रकार घडू शकतो. अशी घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून मोबाइलची काळजी कशी घ्यायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

थर्ड पार्टी चार्जर वापरू नका - ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की, खरेदी करताना कंपनीने फोनसोबत दिलेल्या चार्जरनेच तुमचा मोबाइल नेहमी चार्ज करा. जर फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुठल्या कंपनीचं चार्जर वापरलं तर आवश्यत तेव्हढं व्होलटेज न मिळाल्याने त्याची बॅटरी गरम होते आणि फुटते. जर तुम्ही USB Type-C पोर्ट किंवा क्विक चार्जर वापरत असाल तर फोन बॉक्समध्ये मिळालेली केबल जरूर वापरा.

फोन जर गरम झाला असेल तर आधी चार्जिंग बंद करा - जर चार्जिंग करताना तुमचा फोन गरम झाला असेल तर, तो नॉर्मल होईपर्यंत अजिबात चार्ज करू नका. फोन पूर्ण थंड झाल्यानंतरच तो परत चार्जिंगला लावा.

सूर्याच्या प्रखर किरणांपासून तुमचा मोबाईल दूर ठेवा - जर तुम्ही उन्हात असाल आणि तुमच्या फोनवरून कुणाशी बोलत असाल तर सूर्याची किरणं थेट तुमच्या फोनवर पडणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. कारण सूर्याच्या प्रखर किरणांमुळेही मोबाइल गरम होतो आणि त्यात स्फोट होण्याची शक्यता जास्त वाढते.

नको असलेले अॅप्स काढून टाका - अनेकजण आपल्या मोबाइलमध्ये भरमसाठ अॅप्स डाउनलोड करून ठेवतात. त्यापैकी बहुतांश अॅप्स असे असतात जे एकदा ओपन केले की त्यांची कार्यप्रणाली सुरूच राहते. असे निरुपयोगी अॅप्स तात्काळ तुम्ही काढून टाका. कारण तुमच्याच नकळत तुमच्या मोबाइलची बॅटरी वापरली जाते. अशात ती गरम झाली तर स्फोट होण्याची जास्त शक्यता असते.

ब्राइटनेस नॉर्मल ठेवा - मोबाइल स्क्रीनचा ब्राइटनेस हा नेहमी कमी ठेवा. ब्राइटनेस जास्त ठेवल्यास मोबाइल झपाट्याने गरम होतो. अशात जर तुम्ही बराच वेळ कुणाशी बोलत राहिलात तर तुमच्या फोनची स्क्रीन गरम होते. त्यामुळे स्क्रीनचा ब्राइटनेस कमी ठेवणं हा एकच त्यावर उत्तम पर्याय आहे.

कव्हर काढून टाका - जर बोलता बोलता तुमचा फोन गरम झाला असेल तर लगेच त्याचं कव्हर काढून टाका. कव्हर काढल्यामुळे तो थंड व्हायला कमी वेळ लागतो आणि त्यामुळे त्यात स्फोट होण्याचा धोका कमी होतो.

चार्जिंग सुरू असताना बोलू नका - अनेकजण मोबाइल चार्जिंगला लावून तासंतास बोलत राहतात. पण, हा प्रकार तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. अशावेळी मोबाइलचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. चार्जिंग सुरू असताना तुमचा मोबाइल थेट वीजेच्या संपर्कात असल्यामुळे तो जास्त गरम झालेला असतो. आणि अशात तुम्ही स्वतः कॉल केला किंवा आलेला कॉल रिसिव्ह केला तर त्यात स्फोट होण्याची जास्त शक्यता असते.

Tags:
First Published: May 8, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading