Home /News /news /

स्वयंपाक घरावर बजेटची संक्रांत, काय महागलं आणि काय झालं स्वस्त?

स्वयंपाक घरावर बजेटची संक्रांत, काय महागलं आणि काय झालं स्वस्त?

An employee of a fuel station counts Indian currency notes to give change to a customer after filling fuel in Ahmadabad, India, Thursday, Aug. 30, 2018. India's reserve bank announced Wednesday that 99.3 percent of the $217 billion in notes withdrawn from circulation in a surprise 2016 attempt to root out illegal hoards of cash had come back into the economy. Prime Minister Narendra Modi's currency decree, which was designed to destroy the value of billions of dollars in untaxed cash stockpiles, caused an economic slowdown and months of financial chaos for tens of millions of people. (AP Photo/Ajit Solanki)

बजेटमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार?

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अनेकांसाठी फायदेशीर असला तरी अनेकांचा भ्रमनिरास करणारा ठरला आहे. मात्र सर्वसामान्यांच्या वाट्याला काय आलं. बजेटमुळे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या. केंद्राच्या अर्थसंकल्पात टॅक्समध्ये वाढीच्या प्रस्तावामुळे सिगारेट, तंबाखूबरोबरच खाण्याचे तेल, पंखे, फूटवेअर, किटरवेयर, खेळणी आणि फर्निचरसारखे आयात करणाऱ्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे न्यूजप्रिंट, खेळाच्या वस्तू, माइक्रोफोन स्वस्त होतील. या वस्तू झाल्या महाग खाली दिलेल्या आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंसाठी आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील -बटर, तूप, तेल, खाद्य तेल, पीनट बटर -ताक, मेसलिन, मका, शुगर बीट सीड्स, बटाटा -च्युइंगम, डाइट सोडा, आयसोलेटेड सोया प्रोटीन -अक्रोड -फुटवेअर, हेयर क्लिप्स, हेयर रिमूव्हिंग उपकरणं -टेबलवेअर, किटनवेअर, वॉटर फिल्टर, ग्लासवेअर -चिनी मातीच्या तयार केलेल्या घरातील वस्तू -माणिक, पन्ना, नीलम आणि दुसरे महागडे रत्न -टाळे -फणी, हेयरपिन, कर्लिंग पिन, हेअर कर्लर -टेबल फॅन, सीलिंग फॅन, पेडेस्टल फॅन -पोर्टेबल ब्लोअर -वॉटर हिटर आणि इमर्सन हिटर -हेअर ड्रायर, हॅन्ड ड्राइंग मशीर आणि इलेक्ट्रिक आयर्न -फूड ग्राइंडर, ओव्हन, कूकर, कूकिंग प्लेट, बॉइलिंग रिंग्स, ग्रिलर आणि टोस्टर -कॉफी आणि चहा बनवणारी मशीन, टोस्टर -इलेक्ट्रो-थर्मिक फ्लूइड हिटर, कीटकनाशख उपकरणं आणि इलेक्ट्रिक हिटिंग रेजिस्चर -फर्निचर, लॅम्प, लाइटिंग फिटिंग -खेळणी, स्टेशनरी, आर्टिफिशल फ्लॉवर, बेल्स, ट्रोफी -मोबाइल फोनचे प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबली, डिस्प्ले पॅनल, टच असेंबली, फिंगरप्रिंट रीडर -सिगारेट, हुक्का, तंबाखू, सुंगधित जर्दा कुठल्या वस्तू होतील स्वस्त काही वस्तूंच्या आयातीवर कस्टम ड्यूटी कमी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे खालील वस्तू स्वस्त होतील -प्युर ब्रेड  ब्रीडिंग हॉर्स -न्यूजप्रिंट पेपर -खेळाच्या वस्तू -मायक्रोफोन -इलेक्ट्रिक वेहिकल
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Budget

    पुढील बातम्या