Home /News /news /

Love आणि Sex : मुलांना आपण प्रेमाबद्दल काय शिकवतो?

Love आणि Sex : मुलांना आपण प्रेमाबद्दल काय शिकवतो?

सिनेमाच्या दुनियेतील रोमान्स, पॉर्नमधील सेक्स हेच सर्व असतं, असं आपल्याला वाटतं मात्र खरं तर...

    एका छोट्याशा शहरात राहणारा किरण... नव्वदच्या दशकातील रोमँटिक बॉलीवूड सिनेमे बघत मोठा झाला. तेच आभासी जग त्याला खरं वाटायला लागलं. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या किरणचे आईवडील खरं तर खूप कडक शिस्तीचे. किरणला चित्रपट पाहायलाही पाठवत नसत ते. तरीही किरण शाळा सुटल्यानंतर गुपचूप आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहायला जायचा. शालेय वयात किरण चित्रपटाच्या रोमँटिक दुनियेत जगत होता, त्याला कारणही तसंच होतं कारण त्याचं खरं आयुष्य भयाण होतं.DDLJ मधला एक सीन किरणला अगदी चांगला आठवतो. हीरो हिरोईनची ब्रा हातात धरून भिरकावतो... हे असं काही केल्यानं मुलगी पटते असंच त्या वयात किरणला वाटायचं. घरातलं वातावरण तर अगदी विरुद्ध होतं, तणावपूर्ण होतं. "माझे आई-वडील एकमेकांशी खूप भांडायचे. एकमेकांवर ओरडायचे, एकमेकांना शिव्या द्यायचे, कधी कधी तर एकमेकांवर वस्तूही फेकून मारायचे. मला खूप भीती वाटायची. माझं घर म्हणजे एक भयंकर आणि चित्रपट म्हणजे एक सुंदर स्वप्न होतं. ते छान जग हवहवंसं वाटायचं. ते माझ्या घरासारखं भीतीदायक नव्हतं. हिरो-हिरोईन दोघंही कधी चुकीचे वागतील हे मला खरं वाटूच शकलं नाही. मी एक दुःखी मुलगा होतो. आनंदासाठी मला असा फिल्मी रोमान्स हवा होता....", किरण सांगतो. किरणच्या आईवडीलांचं एकमेकांशी पटत नव्हतं, घरातील अशा वातावरणामुळेच त्याने चित्रपट हेच आपलं खरं आयुष्य म्हणून स्वीकारलं. किमान चित्रपटांमध्ये तर नायकाला नायिका खऱ्या अर्थाने आवडते, असं तो धरून चालला होता. म्हणून चित्रपटातल्या या प्रेमाचा, रोमान्सचा आनंद तो लुटत होता. किरणच्या शाळेतील मोठी मुलंसुद्धा मुलींच्या प्रेमाबद्दल असंच काही धरून चालायची. मुलींचा घरापर्यंत पाठलाग करणे, मुलींकडे पाहून शिट्टी वाजवणे, त्यांना त्रास देणे हे सर्व उद्योग त्याच्या शाळेतली मुलं करायची, ते किरणला आठवतात. त्याला यात काही वावगं वाटलं नाही. आसपास कुणी हे चुकीचं आहे, हे रोमँटिक नाही हे सांगणारंही नव्हतं तेव्हा. किरण 15 वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या या विचारांमध्ये बदल होत गेले. त्याला निमित्त ठरलं त्याच्या बहिणीबरोबर घडलेला एक प्रसंग. एके दिवशी त्याची बहीण ट्युशनहून घरी रडत आली. ती आईबाबांना काहीच सांगत नव्हती. तिने किरणला मात्र विश्वासात घेतलं आणि जे काही घडलं ते सांगितलं. संध्याकाळी ट्युशनहून घरी परतताना 2 मद्यधुंद अवस्थेतली मुलं तिचा बाईकवरून पाठलाग करत होती आणि पकडण्याचा प्रयत्न करत होती. बहिणीकडून हे सर्व काही ऐकताच किरणच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडलं. "महिलांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, हे मला त्यावेळी पहिल्यांदा समजलं. माझ्या बहिणीने माझ्यावर विश्वास ठेवून मला हे सर्व सांगितलं, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी त्यावेळी अशा वयात होतो, की मला गर्लफ्रेंड असावी असं वाटतं होतं. जर माझी बहीण कोणत्या परिस्थितीतून गेली हे मला समजलं नसतं, तर मीदेखील एखाद्या मुलीचा असाच पाठलाग केला असता, तिला त्रास दिला असता." मात्र हे समजल्यानंतरही महिलांप्रती आणि त्यांच्यासोबत असलेल्या नात्याबाबत चांगला दृष्टिकोन ठेवणं कठीणच होतं. एकदा किरणने आपल्या एका चुलत भावाला बाईकवरून महिलेचा पाठलाग करताना पाहिलं, इतकंच नव्हे तर तो महिलांकडे पाहून अश्लील शब्दही बोलत होता. किरणने यावरून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा तो किरणला म्हणाला, "या मुली असे ड्रेस घालून फिरतात आणि अशा दिसतात ना की, स्वतःवर कंट्रोल कसा ठेवणार!" मुलींना त्रास देणाऱ्या ज्या चुलतभावाला किरण समजावत होता, त्याच भावाकडून त्याला पॉर्नोग्राफीचं (pornography) विश्वही खुल झालं. “हे बघ पॉर्न पाहणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं मी म्हणत नाही. पण आता या वयात कोणतीही मुलगी माझी मैत्रीण नाही. मी जिथं मोठा झालो, तिथं मुलं आणि मुलींना एकमेकांशी बोलण्यासही मनाई आहे आणि जरी आम्ही बोललो तरी लव्ह किंवा सेक्सबाबत बोललो नाहीत” अशी सारवासारव करत किरणनं सुरुवातीला स्वत:ला सावरण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो फार यशस्वी झाला नाही. सिनेमांच्या दुनियेत रमणाऱ्या किरणला पॉर्नोग्राफीचं जग दिसताच त्याची भुरळ त्याला पडली. किशोरवयात किरणला महिला आणि स्त्री लैंगिकतेबाबत (female sexuality) जे काही कळलं ते फक्त पॉर्न पाहून. "त्यातले काही पॉर्न तर खूप वाईट होते. हीन पातळीचे होते. पण माझ्यासाठी स्त्रीदेहाचं ते दर्शन म्हणजेच प्रेम आणि शरीरसंबंधांचं ज्ञान होतं. साहजिकच स्त्रीला वस्तू म्हणून पाहणं या अशामुळे घडतं." किरण कॉलेज शिक्षणासाठी दिल्लीला गेला आणि तेव्हाच पहिल्यांदा मुली त्याच्या मैत्रिणी झाल्या. “त्यापैकी काही खूपच बोलक्या आणि मनमोकळंपणाने बोलणाऱ्या होत्या. त्या सर्वकाही बोलायच्या. सुरुवातीला यामुळे मी खूप नव्हर्स व्हायचो”, किरण म्हणाला. सुदैवाने किरणमध्ये कुतूहल आणि शिकण्याची वृत्ती होती. नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. महिलांबाबत जाणून घेण्यासाठी त्याने स्त्रीवादाबाबत (feminism) चर्चासत्रं, व्याख्यानं ऐकली. वर्कशॉपला हजेरी लावली आणि यामुळे तो आभासी दुनियेतून वास्तवादी दुनियेत आला. किरण म्हणाला, “लहानपणी ज्या दुनियेत मी जगत होतो, ती मागे पडू लागली आणि माझं बालपण किती धोकादायक होतं, हे मला उमजलं. माझे वडील, माझा चुलतभाऊ आणि माझे बालपणातील मित्र यांना या गोष्टी शिकायला नाही मिळाल्यात, याचच मला दु:ख वाटतं” मुलींबाबत किरणचे विचार हळूहळू बदलले इतकंच नव्हे, तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि अखेर रिलेशपमध्ये आल्यानंतर प्रेम म्हणजे सोपं नाही, खूप गुंतागुंतीचं आहे, हेदेखील त्याला समजलं. "मला माझ्या गर्लफ्रेंडशी बोलायचं होतं. पण नेहमी पुरुष यात एक चूक करतात. ते गर्लफ्रेंडशी व्यक्ती म्हणून कधी बोलतच नाहीत. त्यांची या नात्यातली भूमिका नेहमीच वरचढ असते आणि मग ते माझी गर्लफ्रेंड म्हणजे एखादी वस्तू असल्याच्या थाटात बोलत राहतात. ते बोलणं. ते नातं मग एकमेकांचं उरत नाही." अगदी सेक्स आणि पॉर्न यामध्येही किती तफावत आहे हे त्याला समजलं. पॉर्नमध्ये दाखवलेल्यापेक्षाही सेक्समध्ये बोलणं, संवाद, नर्व्हसनेस किती असतो, हे समजल्यानंतर किरण चक्रावूनच गेला. आपलं भूतकाळातील आयुष्य पाहता यापैकी काही गोष्टी जर त्याला आयुष्याच्या सुरुवातीला समजल्या असत्या तर बरं झालं असतं, अशी खंत किरणने व्यक्त केली. मात्र भविष्यात स्त्री-पुरुष यांची मैत्री तरुण वयात व्हावी, जेणेकरून ते एकमेकांकडे माणूस म्हणून पाहतील आणि एकमेकांच्या समस्या समजून घेतील, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. किरण म्हणतो, "विरुद्धलिंगी व्यक्ती म्हणजे रहस्य वाटू नये. ती व्यक्ती पहिली माणूस असते. फक्त एक माणूस असावा, समान माणूस. मी परिपूर्ण नाही. अजून बऱ्याच गोष्टी मी शिकलो नाही. माझ्या बालवयाने मला खूप काही शिकवलं, महिलांबाबत घाणेरडे विचार ठेवणाऱ्या व्यक्तींकडूनही मी बरंच काही शिकलो आणि अजूनही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे”
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Valentines Day 2020

    पुढील बातम्या