पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची काय आहे सद्यस्थिती; शेतकरी जमिनी देण्यास तयार मात्र...

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची काय आहे सद्यस्थिती; शेतकरी जमिनी देण्यास तयार मात्र...

पुणे-नाशिक रेल्वेसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे मात्र...

  • Share this:

पुणे, 31 मे : पुणे-नाशिक रेल्वेसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे. मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. पोलीस बळाचा वापर करू नका, शेतकऱ्यांचा नाद करु नका. आमच्या मागण्या मान्य करा, तरच मोजणी करा असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आज दिला. खेड तालुक्यातील होलेवाडी मांजरेवाडी या परिसरातून देशातील पहिली पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम सुरू झाले आहे.

रेल्वे अधिकारी व खेड महसूल विभाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया समाजावून सांगत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी घेणार आहे. मात्र जमिनीला काय भाव देणार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुला रेड झोन असल्यामुळे शेतकरी भूमीहिन होणार आहे. त्यांचा योग्य तो मोबदला काय देणार, असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान विचारीत आहे.

शेतकऱ्यांना या बाबत योग्य उत्तर रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळत नाही, अशी बाब समोर आली आहे.

हे ही वाचा-पुणे: माजी नगरसेवकाला जुगार खेळताना अटक; बंद बंगल्यात सुरू होता धक्कादायक प्रकार

खेड तालुक्यातील मांजरेवाडी, होलेवाडी, टाकळकर वाड़ी या परिसरात काही दिवसापुर्वी रेल्वे मार्गाची मोजणी करण्यासाठी रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचारी आले होते. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले होते. आज पुन्हा ३१ मे रोजी मांजरेवाडी, होलेवाडी येथे रेल्वे मार्गाची मोजणीबाबत शेतकऱ्यांना नोटीस बजवण्यात आली होती. मात्र जोपर्यत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यत मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकरी मोठया संख्येन जमले होते. काही हिंसक प्रकार होऊ नये म्हणून मोजणी रद्द करून रेल्वे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा समजुन सांगणाचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक झाले.

रेल्वे प्रकल्पाअंतर्गत आलेल्या शेतजमिनी कोट्यवधी रुपायांच्या आहेत. काही शेतकऱ्यांची तुटपुंजी शेतजमिन रेल्वेसाठी जाणार असून ते आयुष्यभर भूमीहिन होणार आहे. रेल्वे मार्ग २५ मीटरचा होणार आहे. तसेच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुने ३० मीटर अंतरादरम्यान रेडझोन पडणार आहे. रेड झोनमध्ये यापुढे शेतकऱ्याला कुठलाही उदयोग धंदा, घर बांधता येणार नाही. त्या जमिनीची किंमत शून्य होणार आहे. त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुंटपुजा आहे. त्यामुळे रेडझोनसाठी लागणारी जमीन रेल्वेने घ्यावी. व गेल्या तीन चार वर्षातील खरेदी विक्रीचे व्यवहार व खुल्या बाजारातील व्यवहार त्यांच्या पाच पट शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी केली जात आहे. याशिवाय रेल्वे मार्गात येणाऱ्या विहिरी, फळझाडे, पाईपलाईन यांचाही योग्य मोबदला द्यावा, असेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोबदला किती देणार हे सांगूनच मग मोजणी करा, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. या परिसरातील सेझ प्रकल्प, राजगुरूनगर शहराबाहेरील पुणे-नाशिक बाह्यवळण यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 31, 2021, 11:46 PM IST

ताज्या बातम्या