S M L

काय आहेत प्रिया वरियरचे 'व्हॅलेटाईन्स डे' स्पेशल प्लॅन्स ?

करोडो नेटीझन्सना आपल्या नयनतीरांनी घायाळ करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार व्हॅलेटाईन डे नेमकं काय करणार, तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही खरंच कोणी व्हॅलेटाईन आलाय का ? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत.

Chandrakant Funde | Updated On: Feb 13, 2018 11:02 PM IST

काय आहेत प्रिया वरियरचे 'व्हॅलेटाईन्स डे' स्पेशल प्लॅन्स ?

13 फेब्रुवारी, बंगळुरू : करोडो नेटीझन्सना आपल्या नयनतीरांनी घायाळ करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार व्हॅलेटाईन डे नेमकं काय करणार, तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही खरंच कोणी व्हॅलेटाईन आलाय का ? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत. कारण प्रियाच्या या नयनतीरांनी लाखो तरुणांचा व्हलेटाईन डे अगदीच स्पेशल बनून गेलाय. म्हणूनच सोशल मीडियावर सध्या जो तो तिच्याच व्हॅलेटाईन प्लॅन्सची चर्चा करतोय. किंबहुना सगळेच प्रियाच्या व्हॅलेटाईन्स डे सेलिब्रेशन बद्दल अधिकाअधिक माहिती जाणून घेण्यास उस्तुक आहेत.

म्हणूनच काही पत्रकारांनी थेट प्रियालाच तिच्या व्हॅलेन्टाईन बद्दल विचारलं असता तिने आपल्या आयुष्यात अजूनतरी कोणीच स्पेशल वन नसल्याचं सांगितलंय. पण तिचा उद्याचा व्हॅलेटाईन्स डे ती तिच्या त्रिचूरमधल्या कॉलेजमध्येच सेलिब्रेट करणार आहे.

सध्यातरी तिच्यासमोर अभ्यास आणि अभिनेत्री बनण्याचेच उद्दीष्ट आहे. तिला बॉलीवूडमध्येही करिअर करण्याची इच्छा आहे ती संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात काम करू इच्छिते. तर हिरो म्हणून ती रणवीर, शाहरुखसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा आहे. दरम्यान, प्रियाच्या ओरू अदर लव्ह या डेब्यू सिनेमाचा आणखी एक टिझर आज रिलीज झाला असून काही तासातच तो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओ मध्ये तर प्रिया आपल्या प्रियकराला थेट किसिंग गन शॉट्सने प्रपोज मारताना दिसून आलीय. या प्रियाच्या या व्हिडिओवरून अनेकांना नागराज मंजुळेच्या सैराटमधील आर्ची - परशामधील नजरभेटीच्या सीन्सची आठवन झाल्यावाचून राहणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close