मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

NFTs ची जादू आता बॉलीवूड व क्रिकेटविश्वावर, चला तर जाणून घेऊ काय आहे NFTs

NFTs ची जादू आता बॉलीवूड व क्रिकेटविश्वावर, चला तर जाणून घेऊ काय आहे NFTs

NFTs हे नॉन-फंगिबल टोकन्स आहेत; हे एक प्रकारचे व्हर्च्युअल ॲसेट्स आहेत, ज्यांना कोणताही फिजिकल किंवा टँगिबल फॉर्म नाही मात्र प्रॉपर्टीचा भाग म्हणून विक्री केली जाऊ शकते.

NFTs हे नॉन-फंगिबल टोकन्स आहेत; हे एक प्रकारचे व्हर्च्युअल ॲसेट्स आहेत, ज्यांना कोणताही फिजिकल किंवा टँगिबल फॉर्म नाही मात्र प्रॉपर्टीचा भाग म्हणून विक्री केली जाऊ शकते.

NFTs हे नॉन-फंगिबल टोकन्स आहेत; हे एक प्रकारचे व्हर्च्युअल ॲसेट्स आहेत, ज्यांना कोणताही फिजिकल किंवा टँगिबल फॉर्म नाही मात्र प्रॉपर्टीचा भाग म्हणून विक्री केली जाऊ शकते.

हल्लीच्या दिवसांत सेलिब्रिटीज व क्रिकेटर्सच्या सामायिक आवडीच्या बातम्या दिसू लागल्या आहेत. तुम्हाला आयपीएल वाटले असेल पण नाही, ते आहे NFTs. सिनेविश्वातील महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान पासून क्रिकेटच्या दुनियेतील झहीर खान, दिनेश कार्तिक पर्यंत, सर्वच ठिकाणी NFTs चा बोलबाला दिसून येत आहे.

पण हे NFTs आहे तरी काय? यात कोण गुंतवणूक करू शकतो? चला तर या अद्भुत NFTs दुनियेची सफर करूयात, NFTs जो निर्विवादपणे सन 2021 चा अधिक लोकप्रिय बझवर्ड आहे.

NFTs काय आहे?

NFTs हे नॉन-फंगिबल टोकन्स आहेत; हे एक प्रकारचे व्हर्च्युअल ॲसेट्स आहेत, ज्यांना कोणताही फिजिकल किंवा टँगिबल फॉर्म नाही मात्र प्रॉपर्टीचा भाग म्हणून विक्री केली जाऊ शकते. त्यामुळे केवळ आणि केवळ मालकाकडेच ॲसेटची मूळ कॉपी असते. चला आणखीन सविस्तर जाणून घेऊयात.

फंगिबल म्हणजे अदलाबदली – उदाहरणार्थ एक पन्नास रुपयांची नोट दुसर्‍या पन्नास रुपयांच्या नोटेसोबत बदली करू शकता ते ही बदली केलेल्या त्याच नोटेच्या मालकीचा कोणताही दावा न करता. खरं तर, फंगिबल ट्रेड करण्यासाठी अदलाबदलीचे माध्यम म्हणून सेंट्रल बँकद्वारे जारी फिएट चलनास अनुमती देते. 

दुसरीकडे नॉन-फंगिबल म्हणजे अदलाबदली न होणारे टोकन्स किंवा ॲसेट्स. त्यामुळे, NFT म्हणून तुम्ही खरेदी करणारे कोणतेही आर्टवर्क किंवा ॲसेटचा भाग युनिक असेल आणि त्याची मूळ कॉपी मालकाकडेच असेल. म्हणूनच, NFTs या अदलाबदली न होणार्‍या डिजिटल ॲसेट्स स्वरुपातील संग्रहणीय वस्तू आहेत.

NFT मालकी कशाप्रकारे काम करते - 

जेव्हा NFTs चा विचार केला जातो तेव्हा इथेरियम इतरांचे नेतृत्व करते. तुम्ही INR वापरून ZebPay सारख्या क्रिप्टो एक्स्चेंजवर इथर खरेदी करू शकता. इथर ही इथेरियम नेटवर्कवरील क्रिप्टोकरन्सी आहे जी ब्लॉकचेन म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा, क्रिप्टोकरन्सीचे मूल्य देखील फंगिबल आहे, त्यामुळे तुमच्या मालकीचे असलेले एक इथर हे तुमच्या मित्राच्या मालकीचे इथर असू शकते. 

दुसर्‍या बाजूला, इथेरियम ब्लॉकचेन वापरून एकदा का तुम्ही NFT बनवले, जे मूलतः एक युनिक क्रिप्टोग्राफिक टोकन आहे, तुम्ही त्याचे मालक बनता आणि सर्वाधिक बोली लावणार्‍याला त्याचा लिलाव करू शकता. NFT खरेदी करणे हे तितकेच सोपे आहे जितके क्रिप्टोकरन्सीमध्ये लिलाव किंमत पे करणे होय आणि मालकी दाखविण्यासाठी ब्लॉकचेनमध्ये समाविष्ट तुमच्या नावासह तुमचे स्वतःचे युनिक आर्टवर्क म्हणून कलेक्ट करणे होय. ज्या व्यक्तीने NFT खरेदी केले आहे ती व्यक्ती अन्य इच्छुक पार्टीला त्याची विक्री करू शकते, जरी ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म त्याचा डिजिटल रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी निर्मात्याचे नाव आणि त्यानंतरचे मालक नेहमी डिस्प्ले करेल.

NFTs हे कोणतेही डिजिटल ॲसेट असू शकते, आर्टवर्कपासून पेंटिंग्स, मोशन पोस्टर्सपर्यंत, म्युझिक पीसेस, गेम प्ले, व्हिडिओ पोस्ट्स, मीम्स किंवा तुमच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स देखील! Twitter चे जॅक डोर्से यांनी या वर्षी मार्च महिन्यात त्यांचे पहिले ट्विट NFT म्हणून $2.9 मिलियन हून अधिकमध्ये विकले. आहे की नाही मजेशीर?

NFTs ची किंमत किती आहे?

NFTs ची जगाला खरी ‘किंमत’ तेव्हा कळाली जेव्हा डिजिटल आर्टिस्ट बीपल यांनी त्यांचे ‘एव्हरीडेज’ नामक NFT आश्चर्यकारक असे $69 मिलियनला विकले. त्यानंतर मात्र लोकांनी सर्व प्रकारच्या NFTs ची बोली व विक्री सुरू केली व ज्याची किंमत मिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. ‘डिझास्टर गर्ल’ आणि ‘न्यान कॅट’ सारख्या मीम्सची विक्री अनुक्रमे  $473,000 आणि $590,000 अशा किंमतीत झाली आहे. अन्य लोकप्रिय NFTs मध्ये रिक अँड मॉर्टी, क्रिप्टोपंक्स आणि वर्ल्ड वाईड वेबचा मूळ सोर्स कोड सारख्या गोष्टींचा समावेश होतो.

भारताशी लिंक – 

NFTs ची ‘हवा’ आता भारतातही वाहू लागली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतःचे NFTs सुरू केले आहे, ज्याची थीम त्यांच्या आयुष्याशी निगडित आहे आणि बीयाँडलाईफ नावाच्या व्यासपीठावर त्यांनी सादर केलेल्या त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची पौराणिक रचना मधुशाला मधील पद्यांचा देखील समावेश होतो. सनी लियोनी ही पहिली बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने तिचे युनिक, हँड-ॲनिमेटेड आर्टचे स्वतःचे NFT कलेक्शन सुरू केले आहे. सलमान खानने देखील NFTs मध्ये ‘एन्ट्री’ केली असून त्याच्या प्लॅटफॉर्मचे नाव बॉलीकॉईन ठेवले आहे. 

या रेसमध्ये क्रिकेटर्स तरी का बरे मागे राहतील? दिनेश कार्तिकने निदाहास T20 सीरिझ दरम्यान बांगलादेश विरोधात मारलेल्या अंतिम बॉल सिक्सला NFT मध्ये रुपांतरीत केले आहे. रिषभ पंतने रेरिओ जॉईन केले आहे, जे क्रिकेट संस्मरणीय वस्तू परवानाकृत करण्यासाठी, पंतच्या आयकॉनिक क्रिकेटिंग क्षणांचे अनन्य डिजिटल संग्रह तयार करण्यासाठी समर्पित व्यासपीठ आहे.

अभिनेता विशाल मल्होत्रा, रॅपर रफ्तार आणि क्रिकेट फाऊंडेशन, सिंगापूर स्थित ब्लॉकचेन व्यासपीठ यांनी क्रिकेटिंग NFTs तयार करण्याचा मानस जाहीर केला आहे ज्याला व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, पार्थिव पटेल, आर. पी. सिंग, पियुष चावला, दीप दासगुप्ता, प्रग्यान ओझा यासारख्या खेळाडूंचे बॅक-अप आहे.

NFTs च्या दुनियेत होत असलेल्या घडामोडी पाहता या डिजिटल ॲसेट्सबद्दलचे प्रेम ही तर सुरुवात आहे. आता तुम्हाला NFTs चे स्वरुप, रुपरेषा समजली असेलच, तर या व्यक्तींकडून होणार्‍या घोषणांकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या आवडत्या क्रिकेटर किंवा बॉलीवूड सेलिब्रिटींचे NFT तुमच्या कलेक्शनमध्ये असणारे कदाचित तुम्ही पहिले असू शकता

तुमचा स्वतःचा क्रिप्टोकरन्सी प्रवास सुरू करण्यास विसरू नका आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींकडेही लक्ष ठेवा. तर मग, आजच सुरू करा तुमची क्रिप्टो गुंतवणूक.

First published:

Tags: Cryptocurrency