S M L

जीएसटी म्हणजे काय रे भाऊ?

जीएसटीच्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 01:34 PM IST

जीएसटी म्हणजे काय रे भाऊ?

27 जून: 1 जुलैपासून देशभर जीएसटी लागू होणार आहे. हा कर लागू झाल्यानंतर भारतातली करप्रणाली पूर्णपणे बदलणार आहे. चला तर जीएसटीच्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या.

1. नक्की 'जीएसटी' आहे तरी काय ?

जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर . सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारांचे 20 हून अधिक कर करदात्याला भरावे लागतात .जीएसटी लागू झाल्यावर या सगळ्या करांची जागा फक्त एकच कर घेणार आहे तो म्हणजे 'जीएसटी'.जीएसटी लागू झाल्यावर वस्तू आणि सेवांवर लागणारे बाकी सगळे कर रद्द होणार आहेत. 'वन नेशन वन टॅक्स' या संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे.2. जीएसटीएन नक्की काय आहे?

गुड्स अॅण्ड टॅक्स नेटवर्क म्हणजे जीएसटीएन. ही एक बिगर सरकारी नॉन प्राॅफिट संस्था असेल.या संस्थेकडे जीएसटीचा सगळा डाटा असणार आहे. स्टॉकहोल्डर्स , टॅक्सपेयर्स आणि सरकार या तिघांनाही लागणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा जीएसटीएन पुरवणार आहे.जीएसटीचे रजिस्ट्रेशन, टर्न फाईल करणे इत्यादी महत्त्वाची कामं जीएसटीएन करणार आहे.

3. जीएसटीएनमध्ये कुणाचा किती वाटा ?

Loading...
Loading...

जीएसटीएनमध्ये केंद्र सरकारचा 24.5 टक्के वाटा आहे तर राज्य सरकार आणि राज्यांच्या फायन्स कमिट्यांचा 24.5 टक्के वाटा असेल. ICICI आणि HDFC सारख्या बँकांचा 10-10 टक्के वाटा असेल तर एनएसई स्ट्रॅटेजिक इनव्हेस्टमेंट कंपनीचा 11 टक्के आणि एलआयसीचा 10 टक्के वाटा असेल.

4.जीएसटीमुळे कुठले टॅक्स बंद होतील?

सेंट्रल एक्साइज ड्युटी (केंद्रीय उत्पाद शुल्क), सर्व्हिस टॅक्स (सेवा कर), अॅडिशनल कस्टम ड्यूटी , स्पेशल अॅडिशनल ड्यूटी ऑफ कस्टम (एसएडी), व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) सेल्स टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय एंड एंट्री टॅक्स, परचेझ टॅक्स, लग्झरी टॅक्स कायमचे बंद होतील .या सगळ्यांच्या जागी एकच गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स लागेल .

5. जीएसटी लागू झाल्यावर किती टॅक्सेस भरावे लागतील ?

जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅक्सेस करदात्यांना भरावे लागणार

1. सेंट्रल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करेल.

2.स्टेट जीएसटी -हा कर राज्य सरकारं त्यांच्या राज्यातील टॅक्स पेयर्सकडून वसूल करतील.

3.इंटिग्रेटेड जीएसटी -दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 01:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close