मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोनानंतर आता Disease X ची दहशत! 10 पट धोकादायक असल्याचा WHO कडून इशारा

कोरोनानंतर आता Disease X ची दहशत! 10 पट धोकादायक असल्याचा WHO कडून इशारा

X आजार

X आजार

कोरोनाला हरवण्यासाठी लस तयार करण्यात आली. त्यानंतरही कोरोनाचं भयंकर रुप संपूर्ण जगानं पाहिलं आहे. मात्र त्याहीपेक्षा घातक व्हायरस X असल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर अजूनही कोरोनाचं सावट आहे. कोरोना आपलं रुप बदलून अधिक घातक होत असल्याने तो पूर्णपणे गेला नाही. कोरोनाची धास्ती आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाने पाहिले. मात्र या कोरोनापेक्षाही 10 पट धोकादायक असलेला व्हायरस जगभरात हाहाकार पसरवेल असं WHO ला वाटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी लस तयार करण्यात आली. त्यानंतरही कोरोनाचं भयंकर रुप संपूर्ण जगानं पाहिलं आहे. मात्र त्याहीपेक्षा घातक व्हायरस X असल्याचं समोर आलं आहे. या आजारामुळे भीती निर्माण झाली आहे. हा पसरला तर कोरोना काळात जी स्थिती होती त्यापेक्षा भयंकर अवस्था होईल असं WHO ने सांगितलं आहे.

'कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरसचा धोका', WHO ने दिला इशारा

इबोला, सार्स आणि झिका यानंतर आणखी एक नाव या लिस्टमध्ये जोडण्यात आलं आहे. या यादीत एका आजाराने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या आजाराबाबत अजून स्पष्ट अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. या आजाराने कोणताही बळी गेला नाही.

तो नवीन एजंट असू शकतो. व्हायरस, बॅक्टेरिया किंवा बुरशी या पैकी काहीही असू शकते. WHO ने 2018 मध्ये हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका वर्षात जगभरात कोरोना पसरू लागला. बाल्टिमोरमधील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाचे संशोधक प्रणव चॅटर्जी यांनी नॅशनल पोस्टला सांगितले की रोग X दूर नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

कोरोना विषाणूनंतर आता या आजाराचं संकट समोर, असा करा बचाव

कंबोडियामध्ये अलीकडील H5N1 बर्ड फ्लू प्रकरणे फक्त एक प्रकरण आहे. रोग X, त्याचे पूर्ववर्ती इबोला, एचआयव्ही/एड्स किंवा कोरोना सारखे, शक्यतो प्राण्यांमध्ये उद्भवू शकतात आणि नंतर मानवांमध्ये पसरू शकतात, ज्यामुळे गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण वाढते.

First published:
top videos

    Tags: Coronavirus