Home /News /news /

लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा

लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा

लॉकडाऊनमुळे (Lockdown) कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) संक्रमण कमी होईल, मात्र तरीही हा व्हायरस थांबणार नाही, असं अर्थशास्त्रतील नोबेल विजेत्यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) भारतात (India) लॉकडाऊन (Lockdown) आहे. मात्र हा लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाव्हायरसचं नेमकं काय होणार, ज्यासाठी हा लॉकडाऊन ठेवण्यात आला तो प्रयत्न यशस्वी होणार का?, असे अनेक प्रश्न पडलेत. या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ते 2 नोबेल विजेत्या (Nobel winner) अर्थशास्त्र तज्ज्ञांनी. लॉकडाऊनमुळे कोरोनाव्हायरसचं संक्रमण कमी होईल, मात्र तरीही हा व्हायरस थांबणार नाही, कदाचित लॉकडाऊननंतर त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं, असं अर्थशास्त्रतील नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफलो यांनी द इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या लेखात असं म्हटलं आहे. हे वाचा - Coronavirus चा सर्वात पहिला रुग्ण सापडला, ज्याच्यामुळे जगभरात विषाणू पसरला या नोबेल विजेत्यांनी सांगितल्यानुसार, सध्या आपण या महासाथीची गती कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत, याला वैज्ञानिक भाषेत flattening the curve असं म्हणतात. याचा अर्थ आपण या आजाराची गती कमी करू शकू मात्र रोखू शकत नाही. लॉकडाऊन याच दिशेनं करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. यानंतर आजार पसरण्याची गती कमी होईल, मात्र त्याचा नाश होणार नाही. याचं कारण आहे, जे लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. ही लोकं या आजाराचे अदृश्यं एजंट असतील आणि आजार पसरवत राहतील. अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं एखाद्या व्यक्तीला हा आजार झालेला असल्यास त्याला पसरण्यापासून रोखणं खूप कमी आहे. शहरातील झोपडपट्टीसारख्या भागात सोशल डिस्टेंसिंग किंवा लॉकडाऊनचं पालन करणं कठिण आहे, ज्यामुळे आजार पसरू शकतो. अशा अनेक जागा आहेत, जिथं आरोग्य सेवा कमजोर आहेत. देशातल्या बहुतेक भागात वैद्यकीय शिक्षण न घेतलेले डॉक्टर काम करत आहेत. अशा ठिकाणी कोरोनाव्हायरसचे रुग्ण जातील आणि तरीदेखील बरं वाटलं नाही तर हे रुग्ण रुग्णालयात जातील आणि व्हायरस असाही पसरत जाईल. हा आजार लोकांमध्ये पसरण्याआधीच लॉकडाऊन करण्यात आलं, याचा अर्थ कोणामध्येही या आजाराचा सामना करण्याची रोगप्रतिकारक शक्ती नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर लोकं घराबाहेर पडतील, एकमेकांच्या संपर्कात येतील आणि तेदेखील आजारी पडतील. हे वाचा - महाराष्ट्रावर आता आणखी एका आजाराचं सावट, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली भीती याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊनचा काही फायदा नाही. यामुळे आपल्याला एक योजना बनवण्यासाठी वेळ मिळेल आणि काही दिवसांत इन्फेक्शनचं प्रमाणही कमी होईल. मात्र त्यानंतर समस्या वाढतील. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये ग्रामीण भागासह संपूर्ण देशात या आजाराच्या उद्रेकासाठी तयार राहायला हवं, असंही या नोबेल विजेत्यांनी म्हटलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या