प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही साधू आणि चालक हे गुजरातकडे चालले होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी 15 मिनिटाने मागे आली. गाडी जशी मागे आली तेव्हा तिथे अचानक लोकं जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली. आम्ही लोकांना अडवलं, जमावाला मारू नका, ते साधू असं सांगितलं पण ऐकायला कुणीही तयार नव्हतं. संतप्त जमावाने त्यांची जीपही उलटून टाकली. आम्ही कसं बसं जमावाच्या तावडीतून सोडून साधू आणि चालकाला चौकीत बसवले होते. त्यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस तिथे पोहचल्यावर पोलिसांनी प्रथम एक साधू आणि चालकाला पोलिसांच्या गाडीत बसविले. हेही वाचा -'सील करून संपूर्ण गावाची हत्या करावी, आम्ही नागा साधूंना घेऊन गावाला घेरणार' त्यानंतर दुसऱ्या साधूला गाडीत बसवायला नेत असताना जमाव आक्रमक झाला आणि जमावाने पुन्हा या साधूवर, पोलिसांच्या गाडीत बसलेल्या साधू आणि चालकावर हल्ला केला. पोलीसही या घटनेमुळे घाबरून गेले होते, अशी अंगावर शहारे आणणारी माहिती प्रत्यक्षदर्शी सोनू दाजी भोरसा यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात आणखी 200 ते 250 जण फरार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन या प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली आहे. या घटनेबाबत अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे. कुणीही आग लावू नये - उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घृण हत्या झाली. निर्जण आणि दुर्गम परिसरात हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहोचले. 16 तारखेला ही घटना घडल्यानंतर 17 तारखेला आरोपींना अटक केली. मुख्य 5 आरोपीही तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. हेही वाचा -जे पुरुषांना नाही जमलं ते महिला ग्रामसेविकेनं करून दाखवलं, तेही 'आर्ची स्टाईल' 'कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे. पण पालघर जिल्ह्याच्या टोकाला दादरा-नगर हवेलीच्या सीमेवर एक दुर्दैवी प्रकार घडला. या काळात सर्वांनी माणुसकी ठेवण्याची गरज आहे. केंद्र शासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. गडचिंचली हे गाव तिथे जायला नीट रस्ता नाही. या घटनेनंतर कारवाई सुरू असून दोन पोलिसांनीही निलंबित केलं आहे. आरोपींना शोधून काढणार आणि शिक्षा करणार. हा धार्मिक हिंसाचार नाही, अफवेमुळे प्रकार घडला,' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. संपादन - सचिन साळवे#Palghar ची घटना घडली त्या गडचिंचले गावचे प्रत्यक्षदर्शी सोनू दाजी भोरसा काय म्हणतात पाहा #palgharlynching #पालघर @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @Palghar_Police pic.twitter.com/3YPBLMujsB
— News18Lokmat (@News18lokmat) April 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.