ममता बॅनर्जींची झोप उडवणारा EXIT POLL, मोदी ठरणार गेम चेंजर

जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. सगळ्यांचं लक्ष असलेल्या पश्चिम बंगालमध्येही असेच चिन्ह आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 09:54 PM IST

ममता बॅनर्जींची झोप उडवणारा EXIT POLL, मोदी ठरणार गेम चेंजर

पश्चिम बंगाल, 19 मे : लोकसभा निवडणुकांसाठी सातही टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती 23 तारखेच्या निकालाची. पण त्याआधी अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांना आपला अंदाज अर्थात एक्झिट पोल वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. सगळ्यांचं लक्ष असलेल्या पश्चिम बंगालमध्येही असेच चिन्ह आहे.

ममता बॅनर्जींची झोप उडेल असा एक्झिट पोल टू डेज् चाणक्यकडून देण्यात आला आहे. चाक्यण्यनुसार, बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला 23 तर काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागणार आहे. 2014ला बंगालमध्ये भाजप फक्त 2 जागा जिंकू शकलं होतं. त्यामुळे आता हे एक्झिट पोल ममता यांना धोक्याचे आहेत असंच म्हणावं लागेल.

उत्तर प्रदेशनंतर ज्या दोन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्त सभा घेतला ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल दुसऱ्या नंबरवर आहे. त्याच बरोबर निवडणुकांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसा झाली. त्यामुळे या राज्याची सगळ्यात जास्त चर्चा आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा वादही शिगेला गेला आहे. त्यामुळे बंगालमध्ये कमळ की गवतफूल बहरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये भाजपला 16 ते 18 अशा जागा मिळतील असे अंदाज देण्यात आले आहेत.

एकूण 42 जागांपैकी बंगालच्या 11 जागांवर भाजप तर काँग्रेस 2 जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 29 जागा मिळतील असं भाकित करण्यात आलं आहे.

Loading...

हेही वाचा : EXIT POLLS 2019 : राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' फ्लॉप, भाजप-सेनेची गाडी सुसाट!

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती.

मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.

सगळ्यात विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकांध्ये भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. तर यावेळी मात्र भाजप 11 जागांवर विजय मिळवेल असा दावा करण्यात आला आहे. यावेळी बंगालमध्ये मतदारांची संख्या देखील 16.8 टक्क्यांनी वाढली आहे.

यावेळी एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजावर विश्वास ठेवला तर, भाजप कुठेतरी तृणमूल काँग्रेसच्या जागांवर सुरूंग लावण्यात यशस्वी झाला आहे. 31.86 टक्के मतांनी भाजप 9 जागांवर फायद्यात असल्याचं दिसतं. तर राज्यात सरकार चालवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षात वोट शेअर कमी झाल्याचं पाहायला मिळतं.

2014 मध्ये भाजपला असनसोल आणि दार्जिलिंग या दोन जागांवर यश मिळालं होतं. मालदा दक्षिण, कोलकाता उत्तर आणि कोलकाता दक्षिण या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना लक्षणीय मतं मिळाली होती. आता पश्चिम बंगालमधल्या किमान अर्ध्या जागा खिशात घालायचं भाजपचं लक्ष्य आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलला असलेल्या जागा टिकवून ठेवायचं आव्हान आहे.

VIDEO : अशोक चव्हाणांची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, वर्तवला नांदेडचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...