रेल्वे स्टेशनवर करत वेल्डिंगचे काम, शिडीचा झाला ओव्हरहेड वायरला स्पर्श; एकाचा जागीच मृत्यू

रेल्वे स्टेशनवर करत वेल्डिंगचे काम, शिडीचा झाला ओव्हरहेड वायरला स्पर्श; एकाचा जागीच मृत्यू

दिव्याच्या दिशेने जाणारी मालगाडी उभी होती. सुदैवाने विद्युत प्रवाहित लोखंडी शिडीचा मालगाडीला स्पर्श न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, 31 डिसेंबर :  वसई रोड रेल्वे स्थानकावर ब्रीजचे काम करताना उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरला लोखंडी शिडीचा स्पर्श झाल्याने शिडी पकडलेल्या कामगाराचा   जागीच मृत्यू झाला. तर  दुसरा कामगार गंभीर भाजला आहे.  त्याच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संध्याकाळी साडे चार वाजता वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ६ व ७ वरनवीन  ब्रीजचे काम सुरू होते. यावेळी फलाटावर उभ्या केलेल्या लोखंडी आय बीमला वेल्डिंग करण्यासाठी लोखंडी शिडी उभी करण्यात आली होती. ती सरकून दुसरीकडे नेत असताना तोल जावून ओव्हरहेड वायरला तीचा स्पर्श झाला. त्यावेळी शिडी पकडून उभ्या असलेल्या दोन कर्मचा-यांना विजेचा जोरदार झटका लागला. यात मथूरा किशनदेव गुप्ता (२८ ) आणि साहिल अन्सारी (२०) रा.पूर्वी,उत्तर प्रदेश यांना जोराचा शॉक लागला. त्यात मथूरा किशनदेव गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याच्यासोबत असलेला दुसरा कर्मचारी साहिल अन्सारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मथुरा गुप्ता याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी फलाट क्रमांक ७ वर दिव्याच्या दिशेने जाणारी मालगाडी उभी होती. सुदैवाने विद्युत प्रवाहित लोखंडी शिडीचा मालगाडीला स्पर्श न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ विज प्रवाह खंडीत केला होता.

मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवीन वर्ष 2020 ला आता काही तास बाकी आहेत याकरिता मुंबई शहरामध्ये व उपनगरांमध्ये होणाऱ्या उत्साहाच्या ठिकाणी  गर्दी आणि वाहतूक समस्या याकरिता मुंबई पोलीस दलाकडून मोठी  सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या रात्री 40 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यावर  तैनात राहणार आहेत.

दरम्यान, वर्ष 2019 ला संपण्यासाठी अवघ्या काही तासांपेक्षा कमी वेळ आहे. यात नवीन वर्षाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी मायानगरी मुंब मध्ये मोठ्या संख्येनं लोकं मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र येतात यावेळी सुरक्षा व्यवस्था आणि लोकांना सुरक्षा निश्चित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत मुंबईतील रस्त्यावर मुंबई पोलिसांचा मोठा पहारा असणार आहे.

संपूर्ण मुंबई शहरामध्ये 40 हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी 31 डिसेंबरच्या रात्री तैनात राहणार आहेत. यासोबतच आरसीपी, क्यूआर टी, एसआरपीएफ, बीडीडीएस पथकही सोबत असणार आहे. संपूर्ण मुंबईत 5000 कॅमेरा निगराणीखाली असणार आहेत. यासोबत एक कंट्रोल रूम आणि यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारीही तैनात करण्यात  येणार आहेत.

महिलांच्या छेडछाडी घटना रोखण्यासाठी यावेळी साध्या कपड्यांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासोबत विशेष पथक ही तैनात केले जाणार आहेत. जास्तीच्या गर्दीच्या ठिकाणी जसे की गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि धार्मिक स्थळावर बाँबस्क्वॉड पथक तैनात करून विशेष तपासणी केली जाणार आहे.

यादरम्यान, हॉटेल्स लॉज तपासणी केली जाणार असून मुंबई पोलीस हॉटेल आणि लॉज मालकासोबत एक बैठक नुकतीच झाली आहे. समुद्राच्या किनारी बोट कोम्बिंग केली जाणार आहेत. आणि त्यांची तपासणी केली जाणार आहे ड्रंक ड्रायव्हिंग यावर मुंबई पोलिसांची खास नजर असणार आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात  जर कुणाला काही अनुचित प्रकाराला सामोरं जावं लागलं तर त्यांनी 100 नंबर डायल करून किंवा ट्विटरवर मुंबई पोलिसांना संपर्क करू शकतात.

याशिवाय वाहतूक विभाग पोलीस ड्रिंक अँड ड्राइव्ह  ड्रायव्हिंग करणाऱ्यांना पकडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात आणि उपनगरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आले आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह थांबविण्याकरिता विशेष कॅमेरे लावले आहेत.  कंट्रोल रूम वाहतूक नियम तोडणाऱ्याला आणि दारू पिऊन गाडी चालवणारा पकडण्याकरिता हे ठिकाण बनवण्यात आले आहेत. कोणत्याही महिलेला असुरक्षित वाटत असेल तर त्यांना जवळील पोलीस व्हॅनमध्ये मदत मिळू शकते रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत गर्दीच्या ठिकाणी काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. 433 लोकावर मागील वर्षी कारवाई करण्यात आली होती. या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Published by: sachin Salve
First published: December 31, 2019, 10:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading