मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वारंवार प्रयत्न करून कमी केलेलं वजन जातं कुठे? जाणून घ्या

वारंवार प्रयत्न करून कमी केलेलं वजन जातं कुठे? जाणून घ्या

वजन वाढीने अनेकजण त्रस्त आहेत. यामुळे अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहेत तर काहीजण योग्य डाएटच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

वजन वाढीने अनेकजण त्रस्त आहेत. यामुळे अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहेत तर काहीजण योग्य डाएटच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

वजन वाढीने अनेकजण त्रस्त आहेत. यामुळे अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहेत तर काहीजण योग्य डाएटच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 23 ऑक्टोबर : वजन वाढीने अनेकजण त्रस्त आहेत. यामुळे अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहेत तर काहीजण योग्य डाएटच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण योगाच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्ही व्यायाम करून हे वजन कमी केल्यानंतर ते नक्की जातं कुठं? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही का ? आज आपण याच प्रश्नाविषयी जाणून घेणार आहोत.

अनेकांना वाटत असते, आपले कमी झालेलं फॅट हे एनर्जित रूपांतरित होतं. पण हे असे नसून यामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या मॅटर कॉन्झर्वेशनाचा सिद्धांत जुळून येत नाही. जवळपास 150 डॉक्टर, डाएटिशिअन आणि ट्रेनरनादेखील हे गणित उलगडलं नसून त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता ते बुचकळ्यात पडले. फॅट कमी होऊन त्याचे रूपांतर मसल्समध्ये होतं असा अनेक जणांना गैरसमज आहे.  तर अनेकांना हे फॅट मोठया आतड्यातून बाहेर पडते असे वाटते. परंतु असे काहीही होत नाही.

कुठे जातं फॅट

जवळपास 150 तज्ज्ञांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु केवळ 3 जणांना याचे बरोबर उत्तर देता आले. न्यू साऊथ वेल्समधील तज्ज्ञांनी हा दावा केला आहे, जवळपास 98 टक्के हेल्थ प्रोफेशनलला देखील याचं उत्तर माहीत नाही. या फॅटचे रूपांतर मसल्समध्ये होत नाही तर हे फॅट पाणी आणि कार्बन डाय ऑकसाईडच्या रूपात शरीराबाहेर पडतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा लघवी करता किंवा श्वास सोडता त्यावेळी हे फॅट तुमच्या शरीरातून बाहेर पडतं. म्हणजेच जर तुम्ही १० किलो वजन केले तर यातील  8.4 किलो तुमच्या फुफ्फुसावाटे बाहेर पडतं तर 1.6 किलोग्रॅम तुमच्या शरीरातील पाण्यावाटे बाहेर पडतं. दारूच्या बाबतीतदेखील असेच असून घामावाटे किंवा शरीरातील पाण्यावाटे हे बाहेर पडत असतं. त्याचबरोबर त्याचा एका छोट्या भागाचे युरियामध्ये रूपांतर होते.

हे वाचा-'पक्ष सोडण्याआधी एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली, पण...'; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

ताकद आणि वजनाचे गणित

आपण दिवसभरात ज्या घन आणि द्रव स्वरूपात अन्न खातो त्याचंच गणित आणि हिशोब आपल्याकडे असतो. पण आपण दिवसभरात जो काही ऑक्सिजन घेतो त्याचा रेकॉर्ड नसतो. त्यामुळे आपण दिवसात सरासरी 600 ग्रॅम ऑक्सिजन घेतो. त्यामुळे आपण दिवसभरात किती खातो याचा हिशोब देखील वेगळा आहे. समजा दिवसाला तुम्ही साडेतीन किलो अन्न खाल्ले आणि दिवसभरात तुम्ही 600 ग्राम ऑक्सिजन घेतो. म्हणजेच तुम्ही दिवसभरात 4.1 किलो वजन तुमच्या पोटात घेतलं आहे. परंतु तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी ते सर्व बाहेर टाकणे देखिल महत्वाचे आहे.वजन कमी करायचे असल्यास यापेक्षा देखील अधिक बाहेर टाकावे लागेल. 75 किलो वजनाच्या व्यक्तीच्या शरीरातून दिवसाला 590 ग्रॅम कार्बन डाय ऑकसाईड आणि 200 ग्रॅम पाणी बाहेर पडतं. महत्त्वाचं म्हणजे आपण झोपेत असल्यास देखील आपल्या शरीरातून 200 ग्रॅम कार्बन डायऑकसाईड बाहेर पडत असतो.

श्वास घेतल्यास कमी होणार वजन?

या सगळ्यातून तुम्ही जर श्वास घेऊन वजन कमी होऊ शकतं असं समजत असाल तर ते साफ चूक आहे. तुमचे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सतत श्वास घेत बसण्याची गरज नसून तुमच्या मांसपेशींच्या सतत हालचालीमुळे तुम्ही वजन कमी करू शकता. त्यामुळे तुम्हाला 100 ग्रॅम वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला 280 ग्रॅम कार्बन डायऑकसाईड बाहेर सोडणं गरजेचं आहे.

First published: