मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Weekly horoscope : 2021 वर्षातील तुमचा शेवटचा आठवडा कसा जाणार?

Weekly horoscope : 2021 वर्षातील तुमचा शेवटचा आठवडा कसा जाणार?

आज दिनांक 26 डिसेंबर 2021 रविवार. तिथी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी. या आठवड्यात होणारे ग्रह बदल आणि इतर ग्रहांच्या स्थितीनुसार पाहूया या आठवड्यात घडणार्‍या घटनांचे संक्षिप्त विवरण. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत मार्गी अवस्थेतअसून शनी शुक्र मकर राशीत आहेत. सूर्य बुध धनु तर मंगळ केतू वृश्चिक राशीत आहेत. राहू वृषभ राशीत आणि चंद्र कन्या राशीत आहे. या सप्ताहात होणारे ग्रह बदल म्हणजे बुधाचे मकर राशीत आगमन 29 तारखेला होईल. तसेच शुक्र वक्री अवस्थेत धनु राशीत प्रवेश करेल. तिथे तो जानेवारीपर्यंत असेल. नवीन वर्ष सर्वाना उत्तम आरोग्य, सुख संपत्ती युक्त जाओ ही सदिच्छा. मेष राशी स्वामी मंगळ वृश्चिकेत केतू सोबत अष्टमात एक विचित्र ताण निर्माण करतो आहे. आरोग्य चिंता लागून राहिल. प्रवास, नकोसे विचार, आणि गैरसमज होतील. 29 नंतर मकर राशीत प्रवेश करणार बुध व्यवसाय नोकरीत उत्तम संधी आणेल  वाणी मध्ये तेज येईल. अधिकार वाढेल. वक्री शुक्राचे धनु राशीत आगमन हुकलेली संधी  पुन्हा मिळवुन देईल. भाग्य साथ देईल  लाभ स्थानातील गुरू  संतती योग आणणार आहे.  एकूण भाग्यशाली रास आहे. वृषभ राशी स्वामी शुक्राचे अष्टमात आगमन होताच थोडा खर्च वाढेल. मात्र  आवक देखील वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भाग्य स्थानातील बुध बहिणी कडुन लाभ दर्शवतो आहे. कार्य क्षेत्रात अनेक सुखद घटना घडतील. तुमचा प्रभाव वाढेल. सप्ताहाची सुरवात संतती सुख चांगले राहील. आर्थिक बाजु उत्तम राहील. परदेशी किंवा लांबचे प्रवास संभवतात. राहू जप करावा. मिथुन राशी स्वामी बुध मार्गी अवस्थेत मकर राशीत प्रवेश करणार आहे. अष्टमात बुध निर्णय घेताना द्विधा मनस्थिती करेल. शुक्र सप्तम स्थानात जोडीदारासाठी अतिशय अनुकूल फळ देईल  शत्रू पिडा, मत्सर या पासून सावध रहा  प्रकृती जपा. खोकला, पोटदुखी इत्यादी पासून सावध रहा. अष्टमात शनि अजूनही सावधगिरीचा इशारा देत आहे.भाग्य स्थानात गुरू सगळ्या संकटाचे निवारण करण्यासाठी समर्थ आहे  सप्ताह मिश्र फळ देईल. शनि उपासना करावी. कर्क सप्ताहाच्या सुरवातीला राशी स्वामी चंद्र शुभ असुन प्रवास योग आणेल. बंधू भेट संभवते. सप्तम स्थानात येणारा बुध जोडीदाराला उत्तम फळ देणारा ठरेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. शनी बुध योग वैवाहिक सुखासाठी फारसा अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. काहींना शुक्र भ्रमण त्रासाचे ठरू शकते. अष्टमात गुरू देखील फारशी अनुकूल स्थिती  देणार नाही. राहू केतू संतती संबंधी समस्या निर्माण करतील. फुप्फुस विकार असतील तर लालसर द्या. सप्ताह बरा आहे. सिंह राशी स्वामी रवि चा धनु राशीत वावर सुखद असुन संतती सुख चांगले राहील. षष्ठ स्थानात  थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील  तसेच  नकारात्मक मानसिकता होईल. छातीचे विकार,कफ असणार्‍यांनी काळजी घ्यावी. विवाह जाण्याचे संकेत आहेत. जोडीदाराला शुभ फळ देणारा काल आहे. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होऊन बदली होण्याचे संकेत मिळतील. सप्ताहात मिश्र फळ मिळेल. कन्या राशी स्वामी बुध चतुर्थ स्थानात असून  घर, वाहन, आई वडीलांच्या भेटीचे संकेत समारंभ असे सुचवत आहे. पंचमात संतती सुख उत्तम राहील. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल. तृतीय स्थानातील मंगळ केतू प्रवासाचे योग आणतील. सांभाळून रहा. नाते संबंध  बिघडण्याची शक्यता आहे. जपुन बोला. गुरु नोकरीमध्ये नवीन  संधी येईल .सप्ताहात चांगला जाईल. तुला राशी स्वामी शुक्र वक्री असुन तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. प्रवास,संवाद, आणि बंधू भेट सुचवतो आहे. चतुर्थ स्थानात येणारा बुध घर अणि वाहन यासंबंधी घडामोड घडेल. घरासाठी खरेदी होईल. बुद्धीचा वापर करून कार्य क्षेत्रात नवीन काही कराल. विद्यार्जन आणि सामाजिक जबाबदाऱ्या यासाठी अतिशय उत्तम काळ असेल संतती प्राप्तीचे योग. सप्ताह अनुकूल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ केतू सोबत आरोग्य चिंता, गैरसमज आणि भांडण घडवून आणणार आहे. तुम्ही शांत रहा. कुठल्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नका. धन स्थानात येणारा शुक्र धन आगमनाची वर्दी देईल. अकस्मात लाभ होतील. उंची कपडे, दागिने खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय उत्तम राहील. उत्तरार्ध अनुकूल. मंगळाचा जप व दान करा. धनु राशीत  येणारा  शुक्र अणि बुध अनुकूल असून व्यवसाय पूरक आहेत. गुरूची कृपा राहील. संतती सुख चांगले राहील. व्यय स्थानात मंगळ केतू मात्र जपून राहण्याचे संकेत देत आहेत. अनाहूत पाहुणे, खर्च, कायदेशीर बाबी यावर भर राहील. आर्थिक स्थिती ठीक राहील. मात्र एकूण सप्ताहात गडबड आणि खूप जाम पडेल. प्रकृती जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. मध्यम सप्ताह. मकर राशी स्वामी शनि शुक्र अनुकूल फळ देणार असून समारंभात सहभाग घ्याल. जोडीदाराची साथ लाभेल. वैवाहिक समस्या वेळीच सोडवा. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख चांगले राहील. पूर्वार्ध अनुकूल आहे. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर यश मिळवून देणारा आठवडा आहे. शनी जप करणे फायद्याचे ठरेल. कुंभ राशी स्वामी शनि शुक्राचे अधिक्रमण व्यय स्थानात असून काही नुकसान होण्याची शक्यता आहे. खूप प्रवास, मौजमजेसाठी  खर्च, असा हा आठवडा अतिशय गडबडीत जाईल. छोटे मोठे समारंभ होतील. तुम्ही सर्वात जास्त व्यग्र राहाल. नावलौकिक प्राप्त होईल. साडे साती आणि राशीत गुरू अशी स्थिती आध्यात्मिक उन्नती साठी अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. ईश्वरी उपासना करावी. मीन अनेक दिवसानंतर थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न कराल.  थोडा वेळ स्वतः साठी ठेवावा लागेल .घरांमधे समारंभ ,नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ असू द्या. अन्नदान केले जाईल. राशी स्वामी गुरू व्यय स्थानात आहे. अध्यात्मिक साधना होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही कारणाने भावंड नाराज होतील. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या