दिवसा कडक ऊन सायंकाळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, असं आहे आज राज्यातलं हवामान!

दिवसा कडक ऊन सायंकाळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, असं आहे आज राज्यातलं हवामान!

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात 14 आणि 15 ऑक्टोबरला हवामान कोरडं असेल. तर 16 ऑक्टोबरला काही गोव्यासह विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : यंदाच्या मान्सूनने सगळ्यांना चांगलंच नाचवलं. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संमिश्र वातावरणाला नागरिकांना तोंड द्याव लागत आहे. ठाणे, नवी मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर कडक उन तर सायंकाळी ढगाळ वातावरणासह पावासाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारी तापदायक तर सायंकाळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्यामुळे नागरिकांना संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी मुंबईमध्ये अनेक उपनगरांमध्ये वाऱ्यासह पावासाने हजेरी लावली. तर नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला.

उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांतून, गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, बिहराच्या काही भागांत तर पश्चिम बंगालमध्ये मान्सून पुन्हा परतला असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावासाचा धोका असणाऱ्या गावांना आणि शहरांना अद्याप सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा...

गेल्या 24 तासांमध्ये मराठवाड्यासह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर 13 ऑक्टोबरला गोव्यासह, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात 14 आणि 15 ऑक्टोबरला हवामान कोरडं असेल. तर 16 ऑक्टोबरला काही गोव्यासह विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्र जिंकण्यासाठी आज मोदी, अमित शहा मैदानात; सत्ताधारी, विरोधकांमध्ये टशन

मुंबईत ढगाळ वातावरण

मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही उपनगरांमध्ये हलक्या सरी बरतील. त्यात संपूर्ण महाराष्ट्रात आज सुट्टीचा वार असल्यामुळे राजकीय सभांचा धडाका असणार आहे. यात पावसामुळे काही व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - भाजप अध्यक्षांवर पवारांची घणाघाती टीका, म्हणाले '5 वर्षांपूर्वी अमित शहा...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 08:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading