पुढचे दोन आठवडे मान्सूनची विश्रांती पण तापमानात वाढ!

पुढचे दोन आठवडे मान्सूनची विश्रांती पण तापमानात वाढ!

कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये थैमान घातलेल्या पावसाने आता मात्र विश्रांती घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : राज्यात कोकणासह सर्वच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकणी अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. पण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. मागील सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात किंचित वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये थैमान घातलेल्या पावसाने आता मात्र विश्रांती घेतली आहे. राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारी आणि मंगळवारी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असेल. तर सोमवारी रात्री हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. नद्यांना महापूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूरमुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. पण पुढचे दोन आठवडे मात्र पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या - एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू

मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुढच्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायग, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या - पुरानंतर आता सांगलीकरांसमोर नवं संकट, घरांमधून निघाले तब्बल 150 साप

घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर पुढच्या आठवड्याभरातही पावसाचा जोर कायम असणार आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर असेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. तर काही दिवस राज्यभर हलका पाऊस असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ढगाळ वातावरण असेल तर कमाल आणि किमान 32, 27 अंशाच्या आसपास राहिल.

पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यभरात पावसाची विश्रांती असणार आहे. तर शनिवारी राज्यात बुलढाण्यामध्ये सगळ्यात जास्त 5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये 2 मिमी, पुण्यात 0.2 मिमी, महाबळेश्वरमध्ये 0.7 मिमी आणि सांगलीत 0.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading